बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार,,दि. 17 मे रोजी बीड येथील मिल्लीया कला व विज्ञान महाविद्यालय, या ठिकाणी होणाऱ्या ईद-ए-मिलाप कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शिवसंग्रामचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱी व शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर्स,वकील,व्यापारी, शासकीय अधिकारी तसेच सर्वसामान्य मुस्लिम बांधव यांना उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसंग्रामच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्त बीड शहरातील हिंदू व मुस्लिम समाजातील ऐक्य अबाधित राहुन भाईचारा कायम राहावा याहेतुने आ. विनायकराव मेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्रामच्याा वतीने बीड शहरात मिल्लीया कला व विज्ञान महाविद्यालय येथे सायंकाळी 06.00 ते 08.00 वाजेपर्यंत ईद-ए-मिलापचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलाा आहे. या निमित्ताने शहरातील सर्व मुस्लिम बांधव व प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अल्पसंख्यांक आघाडी शिवसंग्रामच्या वतीने अब्दुल खालेक पेंटर, शेख कुतुबभाई, जहीर कादरी,अँड. शेख फेरोज,शेख आबेद भाई, शेख अखिल भाई, अमजद पठाण, शकील खान, जाकीर हुसेन, शेख नदीम शेख गणी,सादेक पठाण, शेख अजहर, सलमान खान, शेख लालाभाई, इमरान जागीरदार, अख्तर पेंटर, शेख राजू,इकबाल रहेमान, आयुब खान, इम्रान खान, शेख खलीलूद्दीन, नदीम पटेल, मोहम्मद गुलाब बागवान, राजू पठाण यांनी केले आहे.
ईद-ए-मिलाप कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहवे ; शिवसंग्राम अल्पसंख्यांक आघाडी..!
RELATED ARTICLES