बीड : मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष परिवारात शहरातील व मतदारसंघातील असंख्य बांधवानी प्रवेश घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारवर व राष्ट्रवादी पक्षावर जनतेचे तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्या कार्यकर्त्यांना विश्वास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्वांना सोबत घेवून विकासाच्या प्रक्रियेत आपण सर्वजण कार्यरत राहू असे मत आ.संदीप क्षीरसागर यांनी इस्लामपुरा भागातील बाबा चौक येथील कार्यकर्त्यांच्या प्रवेश सभेवेळी व्यक्त केले.शहरातील इस्लामपूरा,बाबा चौक परिसरातील नेते सय्यद नविदउजम्मा,सय्यद इम्तियाज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी रविवार (दि.15) रोजी जाहिर सभा घेवून आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. आपल्याकडे जे काही प्रवेश होतात ते देणे-घेणे न करता होत आहेत. मागील काळात पुर्ण देशामध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्याचे काम काही विकृतींनी केलेले आहे. परंतू मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या मतदार संघामध्ये हा सलोखा डगमगू न देण्याचा निश्चय आपण केलेला आहे. हा सलोखा कायम राहणार आहे असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास परिसरातील लहानथोर मंडळी उपस्थित होती. यावेळी मोठ्या जल्लोषात सय्यद नविदउज्जमा, सय्यद इम्तियाज यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमास माजी आ.सय्यद सलीम, डॉ.बाबु जोगदंड, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, वैजीनाथ नाना तांदळे, खुर्शीद आलम, शेख शप्पो, जुनेद जहागीरदार, पिंटू पवार, विद्याताई जाधव, पंकज बाहेगव्हाणकर, पाशाभाई, जैतुल्ला खान, मोहसीन मेंबर, मामु गुत्तेदार, उत्तरेश्वर सोनवणे, रशीदभाई, कालु बेग, रफिक पटेल, शेख रईस, मुजीब एवन टेलर, सुशिल जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.


