कोरेगांवचे सरपंच बालाजी तांदळे यांच्या पॅनल चा दणदणीत विजय, विजयानंतर जल्लोष साजरा
केज : तालुक्यातील कोरेगाव येथील सेवा सहकारी सोसायटीचे मतदान नुकतेच पार पडले त्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री श्री.धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे कोरेगाव सरपंच श्री.बालाजी तांदळे यांच्या पॅनलने सेवा सहकारी सोसायटी मध्ये दणदणीत विजय मिळवला आहे कोरेगाव सेवा सहकारी सोसायटी मध्ये पाच गट विरोध एक गट अशी लढत झाली होती. त्यात एक गट म्हणजे पालकमंत्री श्री. धनंजय मुंडे यांचे समर्थक सरपंच श्री.बालाजी तांदळे यांचा व इतर पाच गट म्हणजे बजरंग सोनवणे गट,रमेश आडसकर गट,मुंदडा गट, विष्णु घुले गट,आणी इतर एक गट अशी लढत झालीएकीकडे बजरंग सोनवणे म्हणतात माझी छाती फाडली तर धनंजय मुंडे दिसतात तर तर मग कोरेगाव सेवा सहकारी सोसायटी मध्ये बजरंग सोनवणे यांचे कार्यकर्ते पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटासोबत का नाहीत?असा प्रश्न सर्व जनतेला पडला आहे? की पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वर जाणुन बुजून दबाव आणण्याचा प्रयत्न तर बजरंग सोनवणे करत नाहीत ना परंतु कोरेगावचे सरपंच बालाजी तांदळे यांनी सिद्ध करून दाखविले की कोणी कितीही विरोध केला तरी आपण मात्र पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतच आहोत .विजयी उमेदवार पुढील प्रमाणे आहेत .तांदळे आश्रुबा लक्ष्मण १५२ तांदळे तुळसाबाई महादेव १४५तांदळे बाबुराव देवराव १५४,तांदळे महादेव नाना १४९,लांब वसुदेव शंकर १४५,शेख दगडू इस्माईल १४६,साबळे गोविंद गणपती १४३,शिनगारे नारायण भिवाजी १६७,तांदळे किसनाबाई बाबासाहेब १६५,तांदळे चंद्रकला सुधाकर १६८,साकुटकर मारुती ज्योती १७५,घुले रामभाऊ १६१,मतांनी विजयी झाले आहेत.विजयी उमेदवार व समर्थकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला .