“सत्तेवर येताच विकासाची गंगा येत आहे केजकरांच्या दारी…!”केजच्या जनतेतून होत आहे समाधान व्यक्त.
केज : कसलाही राजकीय वरदहस्त नसताना , कुठलाही राजकारणाचा, समाजसेवेचा अनुभव नसताना समाजसेवेचे व्रत अंगीकारलेले नेतृत्व तसेच केज शहराचा विकास करण्यासाठी,जनसेवेचा वसा घेतलेला धाडसी समाजसेवक हारूणभाई इनामदार यांनी आजपर्यंत केज वासियांची केलेली निस्वार्थ सेवा,समाजसेवा, सर्वधर्मसमभावातून प्रत्येक जातीतील तरूण, बेरोजगार,गोरगरीब, गरजवंत ,यांची सेवा करण्याचा मनोमन निर्धार केलेले नेतृत्व म्हणजेच जनविकास आघाडीचे सर्वेसर्वा,संस्थापक अध्यक्ष मा.हारूणभाई इनामदार यांनी जातीचे राजकारण न करता अनुसुचीत महिला सदस्यांला केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विराजमान करून निस्वार्थ सेवेचे आदर्श उदाहरणच समाजापुढे ठेवले आहे. आजपर्यंत राजकारणाच्या मैदानात हार-जीतचा विचार न करता अविस्मरणीय व निरंतर गोरगरीबांची मनोभावे सेवा केली व आजही चालू आहे, हारूणभाई इनामदार एक शांत, संयमी ,गोरगरीबांचे नेतृत्व म्हणून ओळख असणारे नेतृत्व आहे,म्हणूनच हारूणभाई इनामदार यांचं नाव गोरगरीब जनतेच्या ओठावर नेहमीच आदराने घेतलं जाते. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन केज शहराचा विकास करण्याचं स्वप्न मनी बाळगून आज त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे, शहरातील लाईटचा प्रश्न असेल, पथदिवे, नाल्या, सांडपाणी,वार्डावार्डा अंतर्गत रस्ते,शुद्ध पिण्याचे पाणी,या सर्व केज नगर वासियांच्या मुलभूत गरजांना अग्रस्थान देवून केज शहराच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी नगरपंचायतची सत्ता हाती येताच अविरतपणे, रात्रंदिवस मेहनत घेवून स्वतः लक्ष देवून जनतेचे ! प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सुचना नगरपंचायतच्याअधिकारी कर्मचारी यांना देवून तात्काळ कामे करून घेण्यात हातखंडा असणारे खरे समाजसेवक हारूण भाई इनामदार हे असून केजच्या जनतेचे खऱ्या अर्थाने ‘जनसेवक’ आहेत. निवडणुकीमध्ये जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा त्यांनी निर्धारच केलेला आहे अशी चर्चा केज शहरवासियातून होत आहे आणी शहरवासीय समाधानी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे केजच्या जनविकास ‘परिवर्तनाचे” दिलेले आश्वासन न विसरता केज शहराचा परिवर्तनीय विकास होताना सध्या दिसून येत आहे, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान संपूर्ण केज शहरात राबवुन केज शहर अगदी चकाचक,स्वच्छ आणी सुंदर होताना दिसून येत आहे, शुद्ध अॕक्वाचे पाणी लवकरच केजकरांना मिळणार आहे त्याचे काम सध्या युद्धपातळीवर चालू आहे, तसेच, माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा घेतलेला निर्णय अगदी प्रशंसनीय आहे संपूर्ण बीड जिल्हयात पहिली केजची नगरपंचायत असेल त्यांनी माजी सैनिकांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.जनतेसाठी कांहीतरी करण्याची जिद्द,आवड, ध्यास, चिकाटी, व धाडस या सर्व गोष्टी अंगी असल्यामुळे त्यांनी राजकारणात समाजसेवा करण्यासाठी प्रवेश केला त्यांच्या प्रभावशाली वक्तृत्व शैलीमुळे व जनाशिर्वादाच्या जोरावर इनामदार यांनी केज नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन करून जनविकासाची मुहूर्तमेढच रोवली.एका अनुसुचीत महिलेला केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी विराजमान करून महिलांचा सन्मान वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे. नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराला पायबंद घालून जनतेच्या,केज शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम ते आज करत आहेत.केज शहराच्या विकासकामात कधीही दुटप्पीपणा केला जात नाही स्वतंत्र जनविकास आघाडी स्थापन करून निवडणुकीमध्ये यश संपादन करून आज केज वासियांना निवडणुकित दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्यासाठी केज शहरातील जनतेच्या समस्या,व मुलभूत हक्कांसाठी स्वतः दक्ष राहून विकास कामे करण्याचा अगदी सपाटा चालु आहे अशा धडाडीच्या, मनामध्ये विकासाची आस असणाऱ्या नेतृत्वावर आज केज नगरवासियांतून समाधान व्यक्त केले जात आहे . केज शहराच्या अनेक भागात बोअर घेउन केज मधील जनतेला पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली.तर अनेक वार्डात लाईटची सोय केली,अशा सुविधा त्यांनी स्वखर्चातून तर दिलेल्याच आहेत परंतू आता सत्ता हाती असल्यामुळे अगदी उत्स्फुर्तपणे विकासाची गंगा केजकरांच्या दारी आता खरीच आली आहे. केज शहरात छत्रपती शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभा करण्याचा घेतलेला ऐतीहासिक निर्णय म्हणजे.सामाजिक ऐक्याचे सलोख्याचे एक आदर्श उदाहरणच म्हणावे लागेल. येणाऱ्या काळामध्ये केज शहराचा जनविकास आघाडी नक्कीच कायापालट करणार व एक स्वच्छ, सुंदर केज शहर बीड जिल्ह्याच्या नकाशावर चमकणार अशी चर्चा केज वासियातून होत आहे.सध्या चालू असलेली विकासकामे ज्या गतीने होत आहेत त्यातून असे दिसून येते की, केजच्या जनतेने टाकलेला विश्वास आणी केज शहराचा विकास करून जनतेचा विश्वासास पात्र ठरवण्याचा निश्चयच जनविकास आघाडीने केलेला दिसून येत आहे.