HomeUncategorizedस्वाभिमानी शेतकरी संघटनेचा १९ मे रोजी आक्रोश आसुड मोर्चा..!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा १९ मे रोजी आक्रोश आसुड मोर्चा..!

रस्ता देता की घारी जाता ..घरात बसुन भागणार नाही आता रस्त्यावर चला रं असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांना आवाहन

केज : स्वाभिमानी शेतकरी संघटना मा.खा.राजु शेट्टी प्रणीत संघटनेच्या वतीने दिनांक १९ मे रोजी गुरुवारी सकाळी १०-०० वाजता जयभवानी चौक ते तहसील कार्यालय अशा विराट आक्रोश आसुड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .रस्ता देता की जाता..आता घरात बसुन भागणार नाही ,रस्त्यावर चला रं ,आता मरायचं नाही तर लढायचं .गेंढ्याची कातडी पांघरूण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकप्रतिनिधी,शासन, प्रशासनाला आसुडाचे फटके मारुन जागे करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या आक्रोश आसुड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या आक्रोश आसुड मोर्चामध्ये केज तालुक्यातील सर्व ग्रामीण रस्त्यांना पुरेसा निधी देउन तात्काळ कामे चालु करण्यात यावीत.गाळपा अभावी शिल्लक राहणाऱ्या ऊसाला एकरी १ लाख रुपये नुकसान भरपाई अनुदान द्यावे ,खरीप हंगाम २०२० चा पिकविमा तात्काळ वाटप करावा तसेच २०२१ च्या खरीप हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील ७५ टक्के पिकविमा तात्काळ वाटप करावा.,सप्टेंबर २०२१ च्या मुसळधार अतिवृष्टीने रस्ते,पुल,बंधारे वाहुन गेले आहेत तसेच नादुरुस्त झालेले आहेत त्याची कामे तात्काळ सुरु करावेत,शेतकऱ्यांकडुन सक्तीची विजबील वसुली थांबवुन शेतीपंपाला १० तास अखंडीत उच्च दाबाने विद्युत पुरवठा करा.,बीड जिल्ह्यातील बंद असलेले सर्व साखर कारखाने सरकारने पुढाकार घेऊन पुढील गाळप हंगामापर्यंत चालु करावेत,अंबाजोगाई – कळंब मार्गावरील लोखंडी सावरगांव – माळेगाव राज्य रस्त्याचे काम तात्काळ चालु करावे,बर्दापुर ते मांजरसुंभा या राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम तात्काळ हाती घेऊन विलंबाने व बेजबाबदारपणे काम करत असलेल्या एचपीएम कंपनीवर दंडात्मक कारवाई करुन अनेक अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या मयतांच्या वारसाला नुकसान भरपाई द्या ,ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गाळप झालेल्या ऊसाचे एफआरपी नुसार एकरकमी बील द्या ,विलंबाने गाळप झालेल्या ऊसाला २०० रुपये मेट्रीक टनाप्रमाणे नुकसान भरपाई द्या ,लोकनेते गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतील प्रलंबीत प्रकरणे विनाविलंब निकाली काढा.,खरीप हंगाम २०२२ च्या पेरणीसाठी शुद्ध दर्जाचे गुणवत्तापुर्ण बि-बियाणे,खते, औषधे यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करा.,खरीप हंगाम २०२२साठी शेतकऱ्यांना ३लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज वाटप तात्काळ चालु करा.,कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलमधुन पाञ झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप करा. या मागण्यासाठी दिनांक १९ मे रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन श्री कुलदीप करपे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच सौ.पल्लवी ओमप्रकाश रांजणकर ,महीला व बालकल्याण सभापती,नगरपंचायत केज यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments