मरकज़ ए अंजूमन ए महेदवीया-एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटना सरसावली
बीड : शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान ची झालेली दुरावस्था दूर करण्याकरिता मरकज़ ए अंजुमन ए महेदवीया आणि एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटना सरसावली असून लवकरच या दोन्ही संघटना स्थानिक जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी सोबत मिळून महेदवीया दायरा कब्रस्तान चा चेहरा-मोहरा बदलणार असल्याचे कमेटीचे सचिव, एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष तथा मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.महेदवीया दायरा कब्रस्तान च्या जमीनदोस्त झालेल्या दोन्ही भिंती बांधणे, बीड नगर परिषद ने बुजविलेली कब्रस्तान ची विहीर पुनरूज्जीवीत करणे, कब्रस्तान मध्ये प्रकाश पाडण्याकरिता विद्यूत पुरवठ्याची लाईन जोडून घेणे. या सर्व बाबींची पूर्तता करण्याकरिता एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी लक्ष घालून महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी बीड चे सचिव एस.एम.युसूफ़ यांची मरकज़ ए अंजुमन ए महेदवीया चे अध्यक्ष पीर ओ मुर्शीद सय्यद महेमूद शहाबुद्दीन काशिफ़ मियाँ क़िबला यांच्यासोबत हैदराबाद येथे भेट घडवून आणली. या भेटीमध्ये महेदवीया दायरा कब्रस्तान च्या सद्यस्थितीबाबत विचार मंथन करण्यात येऊन ठरविण्यात आले की, मरकज़ ए अंजुमन ए महेदवीया आणि एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटना जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड सोबत मिळूनमहेदवीया दायरा बीड चे पीर ओ मुर्शीद हज़रत रौशनमियाँ क़िबला यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त पीर ओ मुर्शीद हज़रत नुसरत तनवीर मियाँ यांच्या नेतृत्वाखाली लवकरच महेदवीया दायरा कब्रस्तान बीड ची दुरावस्था दूर करण्याकरिता आवश्यक ते सर्व कामास लवकरच सुरुवात करतील. यामुळे आता लवकरच महेदवीया दायरा कब्रस्तान ची दुरावस्था दुर होईल असे एस.एम.युसूफ़ यांनी म्हटले आहे.