अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरू असून शुक्रवार, दिनांक १३ मे रोजी युवक कार्यकर्ते योगेश माने यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.शुक्रवार, दिनांक १३ मेरोजी तरूण नेतृत्व योगेश माने यांनी व त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या सूचनेवरून तसेच विधान परिषदेचे आमदार संजयराव दौंड, माजी आमदार पृथ्विराज साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उज्जैन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला. प्रवेश करणा-या सर्वांचे विधान परिषदेचे आमदार संजयराव दौंड, माजी आमदार पृथ्विराज साठे यांनी पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले. यावेळी सिध्दू लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग अंबाजोगाईचे शहराध्यक्ष महेश वेडे, महेश उर्फ गुड्डू जोगदंड, तालुका उपाध्यक्ष स्वप्निल हातागळे, तालुका सरचिटणीस भूषण कांबळे, अंबाजोगाई शहर उपाध्यक्ष आकाश चंद्रकांत बनसोडे, शहर सरचिटणीस केशव जोगदंड, प्रविण कांबळे, सुरेश जाधव, गणेश मोरे, जीवन वैद्य, रामेश्वर जाधव, आशिष गोडबोले, नागेश आगळे, संगा कांबळे, रोहित सावंत, रोहित काळुंके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शुक्रवारी योगेश माने यांचा वाढदिवस ही असल्यामुळे उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी माने यांचे वाढदिवसानिमीत्त हार्दिक अभिष्टचिंतन केले. यावेळी योगेश माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा पालकमंञी ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि महाविकास आघाडी सरकारचे लोकहिताचे कार्य हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार आहोत असे योगेश माने यांनी याप्रसंगी सांगितले.
