HomeUncategorizedताई सेवा प्रतिष्ठान साबला यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..!

ताई सेवा प्रतिष्ठान साबला यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..!

केज : विधानसभा मतदार संघाचे युवा नेते मा. अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त साबला गावातील सर्व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ताई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष – शिवश्री नरहरी काकडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकरराव काकडे, माजी सरपंच साबला हे होते तर प्रमुख पाहुणे सर्वश्री धनंजय धाट, मुख्याध्यापक,सोनाजी काकडे, सहशिक्षक, उमाशंकर आण्णा शिंदे, निवृत्त सहाय्यकफौजदार, महादेव कटारे,सरपंच, काशिनाथ नाईकनवरे, उपसरपंच,श्रीमंत नाईकनवरे, मुरलीधर रोकडे चेअरमन सावित्रीबाई फुले बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित साबला इत्यादी मान्यवर मंडळीच्या हस्ते गावातील सर्व विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक पर बोलताना ताई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहरी काकडे यांनी मा.अक्षय भैय्या मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की,केज विधान सभा मतदार संघात तसेच साबला गावात जे काही विकास कामे केली त्या सर्व कामाचे श्रेय स्वर्गीय विमलताई मुंदडा तसेच आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा आणी युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यांना दिले.आणी तसेच अक्षय भैय्या मुंदडा यांना उदंड आणी निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवश्री मधुकरराव काकडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना असे म्हटले की,केज आणी अंबाजोगाई शहराचा आणी ग्रामीण भागाचा खरा विकास जर कोणी केला असेल तर तो या मुंदडा परिवाराने केला अशा शब्दात केलेल्या कामाचे कौतुक ही केले. यानंतर अशाच प्रकारची विकास कामे त्यांच्या हातून व्हावीत म्हणून अक्षय भैय्या मुंदडा. आणी त्यांच्या कुटुंबातीलं सर्व सदस्य यांचे आयुष्य निरोगी राहो अशी सर्वांच्या साक्षीने ईश्वर चरणी प्रार्थना केली. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व तरुण सहकारी मित्रमंडळी उपस्थित होते. त्यामध्ये अशोक काकडे ,शिवश्री ज्ञानेश्वर पांचाळ, रामदास मुळे, शिवश्री रामराजे शिंदे, महादेव काकडे, पोपट काकडे, विश्वनाथ नाईकनवरे,अविनाश पुरी, सोपान नाईकनवरे,ओम काकडे,आकाश काकडे, उध्दवराव नाईकनवरे, रामराजे काकडे, अभिमान नाईकनवरे, गणेश काकडे,सोपान नाईकनवरे,सदाशिव परळकर साबला गावातील इत्यादी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरहरी काकडे यांनी केले तर आभार शिवश्री अशोकराव काकडे यांनी मानले.

अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments