संसार उपयोगी साहित्य व नगदी पन्नास हजार रुपये जळुन खाक या आगीत ३ लाखाचे नुकसान
अर्धापूर : तालुक्यातील निजामपूर वाडी येथे दि.११ बुधवारी रोजी दुपारी घरास अचानक लागलेल्या आगीत पूर्ण साहित्य जळून खाक झाले तसेच अत्यंविधीसाठी माणसे घेऊन आलेला अँटो पूर्ण जळाला आहे. निजामपूर वाडी येथील शेख फारूख खाजामिया यांच्या घराला अचानक पणे आगीत गहू,ज्वारी,डाळ,एलसीडी, कुलर,लाकडी पलंग,पलंगावर गादीखाली ठेवलेले नगदी पन्नास हजार रुपये आगीच्या विळख्यात आल्याने पूर्णपणे जळून खाक झाले असून आग विझविण्यासाठी गावातील नागरिकांनी प्रयत्न केले पण आग एवढी भयानक होती.की या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.शेख फारूख खाजामिया यांचे कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील शेलगावकर यांनी अन्नधान्य किट मदत करत नगदी पैसे देत धिर दिला आहे. या आगीत अंत्यविधीसाठी आलेल्या अँटो सावली असल्यामुळे घराच्या बाजूला उभा केला होता त्या आगीत अँटो जळून खाक झाला आहे.या आगीत तिन लाखाचे नुकसान झाले आहे.