अर्धापूर : नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पार्डी म.जवळ बस कंटेनरचा अपघात झाला असून चालकासह अन्य काही जण गंभीर जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. गावाजवळ नांदेड ते हिंगोली मार्गे जाणारी बस क्र.( एम एच २० बी एल १७०७ ) व वारंगा ते नांदेड मार्गे येणारा कंटेनर क्रमांक (आर.जे. ३२ जी.बी. ७१०१ ) दोघांची समोरासमोर धडक झाली यात एसटी चालक रेशमाजी फुले ५५ नांदेड पाय फक्चर झाला आहे, गोदावरी पवार वय ६५,गंगाराम पवार वय ७२ दोघे शाहापुर वाडी,यशवंत लढे मेंढला वय ४५, विजय राजे पुसद वय ७०,सुभाष मस्के (वय ६५) यांच्या सह ४ जन गंभीर जखमी झाले आहेत १५ जन किरकोळ जखमी झाल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे.सदर बसमधील पंचवीस ते तीस जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली असून बसमधील २५ जण जखमी झाले आहेत तर १० जण गंभीर जखमी आहेत. यावेळी घटनास्थळी १०८ रुग्णवाहिकेचे डॉ.आनंद शिंदे, चालक रणधीर लंगडे व महामार्ग पोलीस रमाकांत शिंदे,ज्ञानेश्वर तिडके,गजानन कदम, संभाजी मोरे, वसंत सिनगारे परिसरातील नागरिकांनी जखमींना मदत केली महामार्ग व १०८ रुग्णवाहिकेने जखमींना शासकीय रुग्णालय नांदेड विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल केले. व रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
बस – कंटेनर अपघात अनेक जण गंभीर जखमी..!
RELATED ARTICLES