HomeUncategorizedखुनी हल्ला केल्याच्या आरोपातुन आरोपीची अटकपूर्व जामीन मंजुर.!

खुनी हल्ला केल्याच्या आरोपातुन आरोपीची अटकपूर्व जामीन मंजुर.!

अँड .संतोष गहिनीनाथ घोलप यांची कामगिरी

बीड : येथील 3 रे सत्र न्यायाधीश साहेब यांनी दिनांक 10/05/2022 रोजी आरोपी रेखा शामसुंदर ढवळे हिची जामीनवर मुक्तता केलेली आहे . सदर केसची हकीकत अशी की , दिनांक 18/04/2022 रोजी सायं . 4.00 वा . सुमारास फिर्यादी नामे शामसुंदर रामसखा ढवळे हा टॅक्टरने शेत नागरीत असतांना पत्नी व तीचा प्रियकर आकाश उर्फ बबलु किसन शिंदे यांनी लोखंडी कुन्हऱ्हाड व लोखंडी गजाने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कुऱ्हाड मारुन फिर्यादीस गंभीर जखमी करुन शिवीगाळ करुन टॅक्टर वरुन खाली ओढुन मारहाण केली . सदर मारहाणीत फिर्यादी बेशुध्द पडल्यानंतर त्यास औषधोपचारा करीता जिल्हा रुग्णालय , बीड येथे शरीक केलेले असतांना पोलीसांना जबाब दिला . सदर जबाबावरुन आरोपींच्या विरुध्द पोलीस स्टेशन नेकनुर येथे गु.र.नं. 76/22 कलम 307 , 324 , 323 , 504 , 506 , 34 अन्वये गुन्हा दाखल झालेला असून आरोपींना अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अॅड . संतोष गहीनीनाथ घोलप यांच्या मार्फत फौजदारी जामीन अर्ज क्र . 353/2022 मा . जिल्हा व सत्र न्यायालय साहेब , बीड यांचेकडे जामीनअर्ज दाखल केला होता . त्या जामीन अर्जावर दिनांक 10/05/2022 रोजी अॅड . संतोष गहिनीनाथ घोलप यांचा प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरुन व आरोपीच्या वतीने घेण्यात आलेला बचाव या सर्व गोष्टींचा विचार करुन मा . न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजुर केलेला आहे . त्यांना अॅड . नितीन पवार यांनी सहकार्य केले . तरी या प्रकरणाकडे नेकनुर परिसरातील व बीड तालुक्यातील लोकांचे लक्ष लागले होते .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments