गेवराई : दि. 05/05/2022 रोजी पोलीस ठाणे तलवाडा येथे एक पिडीत मुलगी वय अंदाजे 6 वर्ष व तिचे आई वय 28 वर्ष असे पोलीस ठाणे तलवाडा येथे हजर येवुन पिडीत मुलीची आई यांनी फिर्याद दिली की , दिनांक 04/05/2022 रोजी पिडीत घरात झोपली असताना आरोपी सुंदर निवृत्ती तायड याने तीस घरातुन शेतात नेऊन तिच्यावर लैंगीक अत्याचार केले . पिडीतेचे आईचे फिर्याद वरुन पोस्टे तलवड़ा गुरन 68/2022 कलम 376 ( अ ) ( ब ) , 452,336,363,506 भादवीसह 4,6,8,12 वा . ले . अ.सं. अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचे तपास मपोउपनि भोसले करीत आहेत . सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सुंदर निवृत्ती तायड वय 34 वर्ष व्यवसाय मजुरी रा . रामपुरी ता . गेवराई जि . बीड हा गुन्हा केल्यापासुन फरार होता . दिनांक 11/05/2022 रोजी सदर आरोपी हा पुणे येथे असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथक पुणे येथे पाठवुन पुणे पोलीसांचे मदतीने आरोपीस ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाणे तलवाडा येथे आणुन त्याचेकडे विचारपुस करता त्याने सांगीतले की सदर दिवशी माझे सोबत विनोद गणपत शरणागत वय 22 वर्ष हा पण असल्याचे सांगीतल्याने त्याचा शोध घेऊन त्यास पोलीस ठाणे तलवाडा येथे आणुन दोघांना दिनांक 12/05/2022 रोजी अटक करण्यात आली आहे . सदरची कार्यवाही मा . श्री . पंकज देशमुख पोलीस अधिक्षक , बीड , मा . श्री . सुनिल लांजेवार अप्पर पोलीस अधिक्षक , बीड . मा . श्री . स्वप्निल राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी , गेवराई यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे तलवाडा सपोनि नवघरे , मपोउपनि भोसले तपासीक अधिकारी पिंक मोबाईल , पोह / 359 खाडे , पोह / 1449 झिकरे , पोह / 606 काकडे , चालक पोको 2175 साळुंके यांनी केली आहे .
बाल लैंगीक गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या.!
RELATED ARTICLES