अन्यथा एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटना स्वतः लावेल;सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांचा इशारा
अहमदनगर : तालुक्यातील दर्गाह दायरा परिसरात असलेल्या हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ यांच्या दर्गाह मध्ये तज़्बी आणि शजरह ठळक अक्षरांमध्ये लिहिलेले फलक लावा अशी मागणी करण्यात आली असून ती पूर्ण करण्यात आली नाही तर एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटना शासकीय-प्रशासकीय स्तरावर कारवाई करून स्वतः लावेल असा इशारा एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दीलावर उर्फ़ फ़र्रूख़ भाई यांनी दर्गाह च्या ट्रस्टींना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ यांचा अहेमदनगर तालुक्यात असलेल्या दर्गाह दायरा परिसरात रौज़ा ए मुबारक (मज़ार) मध्ये जुनी तज़्बी आणि शजरह तपशिलांच्या जागी मोठा तपशील लावण्याची विनंती दर्गाह चे ट्रस्टी शेख साबीर लाड मुहम्मद साब यांना एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी काही काळापूर्वी केली होती. परंतु यावर एक ट्रस्टी या नात्याने शेख साबीर यांनी यावर अद्यापपर्यंत अंमलबजावणी केली नाही. तसेच फ़र्रूख़ यांना फिरख़ा परस्ती (मुस्लीम समाजातील वेगवेगळे जनसमुदाय) ची भीती दाखवत टाळाटाळ केली. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की, हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ़ फक्त आपल्या भारतातच नाही तर अख्या जगात जिथे-जिथे मुस्लीम समाज राहतो आणि ज्यांना-ज्यांना हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ़ यांच्या व त्यांच्या रौज़ा ए मुबारक (मज़ार) बद्दल माहिती आहे त्यांना सर्वश्रुत आहे की, हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ़ हे सुन्नी मुस्लीम समाजातील महेदवीया जमाअ्त चे होते. तसेच ते महेदवीया समाजाचे संस्थापक सय्यद मुहम्मद महेदी ए माऊद अलैहिस्सलातूस्सलाम यांचे शिष्य होते. हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ़ यांच्या रौज़ा ए मुबारक (मज़ार) च्या ज़ियारत साठी जगभरातून मुस्लीम महेदवीया समुदायाचे भाविक भक्त नियमितपणे दर्गाह दायरा येथे येतात. मोठ्या आस्थेने व श्रद्धेने दर्शन घेतात. हज़रत यांना शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या काळापासूनचा इतिहास आहे. अर्थातच हज़रत शाह शरीफ़ यांची दर्गा ही पुरातन काळापासून अस्तित्वात असून ऐतिहासिक आहे.अशा हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह शरीफ़ (रह.अलै.) यांच्या रौज़ा ए मुबारक (दर्गाह) च्या आत जुनी तज़्बी आणि शजरह चा तपशील दाखविणारा फलक काढून टाकण्यात आला असून ही बाब काही स्थानिक जाणकारांनी एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल संघटनेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संघटनेकडून दर्गा ट्रस्टींना याविषयी प्रथम भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आले परंतू त्यांनी टाळाटाळ केल्याने संघटनेने ट्रस्टींना अधिकृतरित्या रीतसर निवेदन पाठवून दर्गाह मध्ये तज़्बी व शजरह मुद्रित केलेले मोठे फलक लावण्याची विनंती केली आहे. जर यानंतरही फलक लावण्यात आले नाही तर एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटना शासकीय व प्रशासकीय स्तरावर कारवाई करून सदरील फलक दर्गाह मध्ये लावेल असा इशारा एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ भाई यांनी ट्रस्टींना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.