१ हजार ३३९ विद्यार्थ्यांना मिळालाआरटीई अंतर्गत मोफत प्रवेश
बीड : जानेवारी महिन्या पासून सुरू असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत आता पालकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात मुख्य निवड यादीतील १ हजार ३३९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाकरच आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांना रिक्त जागेवर प्रवेशाची संधी मिळणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी दिली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार , दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येते. या प्रक्रियेसाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दि.३० मार्च रोजी आगामी शैक्षणिक वर्षातील (२०२२-२३) प्रवेशासाठी प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या आरक्षणाची सोडत काढली यात बीड जिल्ह्यात २२७ पात्र शाळांमधे ४ हजार ९५२ इतके ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ८३० विद्यार्थ्याची निवड ही मोफत प्रवेशासाठी झाली होती त्या पैकी १ हजार ३९९ विद्यार्थ्यांचा मोफत प्रवेश झाला आहे. यात बीड तालुक्यात आणखी ९९ जागा रिक्त आहेत तर जिल्ह्यात रिक्त जागेवर प्रतीक्षा यदितील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. अशी माहिती मनोज जाधव यांनी दिली आहे.अनेक पालकांनी गोरगरीब विद्यार्थ्याच्या प्रवेशावर डल्ला मारला आहे. यात बोगस आधार , बँक पासबुक आणि भडेपत्रचा समावेश आहे. पडताळणी समिती कडून कागदपत्रांची कटाक्षाने तपासणी नझाल्याने बोगस प्रवेशाला वाव मिळाला आहे. आपण माहिती अधिकारात प्रवेशित विद्यार्थ्यांचे कागदपत्रे मागवून या संदर्भात पुराव्यानिशी शिक्षण संचालका कडे लेखी तक्रार करणार आहोत असे मनोज जाधव यांनी सांगितले
पालकांनी नोंदवला प्रवेश प्रक्रियेवर आक्षेप
जिल्ह्यात अनेक पालकांनी बनावट कागदपत्रे तयार करून बोगस प्रवेश मिळवले आहेत. यात खरे लाभार्थी प्रवेशा पासून वंचित राहत आहेत. या प्रवेश प्रक्रियेवर बीड येथील काही पालकांनी आक्षेप नोंदवला आहे. आता पालक जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना झालेल्या बोगसगिरी बाबद निवेदन देणार आहेत.