बीड : लोकसेना संघटना अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहे समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज उठवणारी समाजासाठी लोक आंदोलन करणारी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात लढा उभा करणारी, राजकारण कमी व समाजकारणावर जास्त भर देणारी राज्यातील एकमेव संघटना म्हणजे लोकसेना संघटना आहे दि.पंधरा मे रविवार रोजी संध्याकाळी पाच वाजता महत्वपूर्ण बैठक बालेपीर संपर्क कार्यालयात पार पडणार आहे या बैठकीत लोकसेना संघटनेच्या जिल्हाध्यक्षासह जिल्हाकार्यकारिणी घोषित होणार आहे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्तयांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आव्हान लोकसेना प्रमुख प्रा.इलियास इनामदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
लोकसेना संघटनेची बीड जिल्हा कार्यकारिणी घोषीत होणार ; प्रा. इलियास इनामदार.!
RELATED ARTICLES