गेवराई : एका 25 वर्षीय महिलेने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील आहे. आज गुरुवारी सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास सदरील महिलेस विहिरी कडे धावत जात असताना तिच्या सासूने बघितले व तिला पाठीमागून जोराने आवाज देत थांबवण्याचे प्रयत्न केले पण सदरील महिलेने पळत जाऊन विहिरीत उडी घेतली अशी सूत्राकडून माहिती मिळाली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी धाव घेत महिलेस वाचवण्याचे खूप प्रयत्न केले पण विहीर खूप खोल असल्यामुळे त्यांचे प्रयत्न विफल झाले. सदरील महिला हिना सुरेश राठोड वय 25 हीस दोन अपत्ये आहेत.अद्यापही आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या.!
RELATED ARTICLES