केज : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,बीड यांचे निर्देशानुसार, तालुका विधी सेवा समिती, केज ववकील संघ,केज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७/०५/२०२२ रोजी केज येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आलेले होते. या लोकन्यायालयात प्रलंबीत दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे एकुण १८६७ प्रकरणे तसेच २९४ दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी ७३ प्रलंबीत दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली तसेच ११ दाखल पुर्व प्रकरणेनिकाली काढण्यात आले.या लोकन्यायालयात प्रलंबीत व दाखल पुर्व प्रकरणांमध्ये रुपये ३२,०९,८८१ रुपये वसूल झाले.या लोकन्यायालयात एकुण ४ पॅनल करण्यात आलेले होते. पॅनल प्रमुख म्हणून न्यायमुर्ती मा.श्री.बी.एस.संकपाळ, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती, केज तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज,मा.श्रीमती मनिषा एन. थोरात, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, केज, मा.श्रीमती एस.व्ही.जंगमस्वामी,२रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,केज, मा.श्री. ए.व्ही.देशपांडे,३रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, केज यांनी काम पाहिले.या लोक न्यायालयात प्रलंबीत दावे दाखल पुर्व प्रकरणे, बँक कर्ज प्रकरणे, धनादेशाची प्रकरणे, घरगुती कौटुंबीक वाद, पोटगी प्रकरणे व तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे सामोपचाराने आपसात तडजोडीने निकाली निघाली. ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी मा. न्यायाधीश,वकील संघ, केजचे पदाधिकारी, सदस्य तसेच बँक अधिकारी,पोलीस प्रशासन, न्यायालयातील सर्व कर्मचारी यांची अथक परीश्रम घेतले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या नविन ईमारतीमध्ये या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असुन पक्षकारांनी आधिकाधीक प्रकरणे सामोपचाराने मिटवावीत असे आवाहन मा.न्यायमुर्ती श्री.बी.एस.संकपाळ यांनी व्यक्त केला .या लोक अदालतीचे सुञसंचालन अॕड.एस.बी.मस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन अॕड.डी.टी.सपाटे यांनी व्यक्त केले .
केज न्यायालयात लोकअदालतीचे यशस्वी आयोजन.!
RELATED ARTICLES