केज : शहरातील अर्धवट काम पूर्णत्वास नेऊन होणारे अपघात थांबविणे व एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी विश्व मानव अधिकार परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,केज शहरातील रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून संथ गतीने व हा रस्ता रखडलेला आहे.अनेक महिन्यांपासून शहरातील काम चालू आहे.त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे,चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी अनेक संघटना, पक्षाच्या वतीने वारंवार आंदोलन मोर्चे काढण्यात आले आहेत.एचपीएम या कंपनीमार्फत हे काम होत आहे. आतापर्यंत दोन वेळा काम पूर्ण करण्याची मुदत वाढून दिल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केज शहरातील धारूर चौक येथे अपघातांची मालिका सुरू आहे आतापर्यंत दहा ते पंधरा अपघात या जागी झाले असून अनेक गाड्या बाजूला स्थित पेट्रोल पंपामध्ये घुसल्या आहेत. सदर होत असलेल्या अपघातामुळे आतापर्यंत अनेक जीव गेले असून काल दोन निष्पाप तरुणांना येथे झालेल्या अपघातात आपले जीव गमवावे लागले आहे .या सर्व अपघातांना कारणीभूत हा रखडलेला काम असून हे काम पूर्ण होणे अतिआवश्यक आहे जेणेकरून नेहमी होणारे अपघात थांबतील. गेंड्याची कातडी पांघरलेल्या एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा हाजी सय्यद लायक राज्य अध्यक्ष, विश्व मानव अधिकार परिषद यांनी मुख्यमत्र्यांकडे निवेदाद्वारे मागणी केली आहे.
शहरातील अर्धवट काम लवकर पूर्ण करून एचपी एम कंपनीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा.!
RELATED ARTICLES