HomeUncategorizedधनेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर अतिरिक्त ५ एम.व्हीचा ट्रान्सफार्मर बसवण्याची ; आ.नमिताताई...

धनेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर अतिरिक्त ५ एम.व्हीचा ट्रान्सफार्मर बसवण्याची ; आ.नमिताताई मुंदडा यांची उर्जामंञ्याकडे मागणी.!

केज : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प हा धनेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावरच आहे . तसेच मांजरा प्रकल्पावरील व कॅनॉल वरील शेतीपंपाचा विद्युत पुरवठा धनेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावरच असल्याने सदर ३३ केव्ही उपकेंद्र ओव्हरलोड झाले आहे . त्यामुळे शेतीपंपास फक्त चार ते पाच तासच विद्युत पुरवठा होतो.त्यातही अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने शेतीपंप चालत नाहीत.त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये शेतीपंपास योग्य दाबाने व व्यवस्थित विद्युत पुरवठा होण्यासाठी धनेगाव ३३ केव्ही उपकेंद्रावर अतिरिक्त ५ एम व्हीचा ट्रान्सफार्मर बसवणे अत्यंत आवश्यक आहे. तरी धनेगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर अतिरिक्त ५ एम व्हीचा ट्रान्सफार्मर बसवणे बाबत त्वरित आदेश देण्याची केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पत्रव्यवहार करून मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments