केज : तालुक्यातील लव्हुरी ग्रामपंचायत ही बर्याच दिवसांपासून भ्रष्टाचार प्रकरणी संपुर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.त्यातच आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे.याविषयी सविस्तर वृत्त असे की,केज तालुक्यातील मौजे लव्हुरी येथे जिल्हा क्रिडा कार्यालय बीड यांच्या मार्फत व्यायामशाळा बांधकाम मंजूर झालेले आहे. सदरील कामासाठी दिनांक 21-10-2021 रोजी जिल्हा क्रिडा अधिकारी बीड यांच्या मार्फत SBINR52021102147810735 या क्रमांकाने RTGS ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामनिधी खातेक्र20259732928 या कामावर 6,00,000 – रुपये जमा करण्यात आले तत्पूर्वी ग्रामनिधी खात्यावर फक्त 772 रुपये शिल्लक होते. सदरील कामाचे टेंडर श्री. राहुल चंद्रकांत कोठावळे यांच्या नावावर करण्यात आलेले आहे. व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी आलेली रक्कम ही व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी खर्च करणे अपेक्षित असतांना ग्रामसेवक धनंजय खामकर यांनी सदरील रक्कम स्वतःच्या व इतरांच्या नावे धनादेशाव्दारे उचलून रक्कमेचा अपहार केलेला आहे. ग्रामसेवक यांनी दिनांक 25.10.2021 रोजी धनादेश क्र. 145105 व्दारे स्वतः 2,00,000 रुपये उचलले आहेत तसेच ग्रामसवेक यानी धनादेश क्रमांक 145111 व्दारे पुन्हा 40,000 रुपये उचललेले आहेत व ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने ज्या कामाचे टेंडर झालेले आहे त्या कामाचे पैसे हे कंत्राटदारास देणे शासन निर्णयाप्रमाणे बंधनकारक असतांना धनादेश क्र. 145105, 145107, 145109, 145110, 145111, 145113, 145114, 145115 , 145116 , 145117, 145119, 157242 या क्रमांकाच्या धनादेशाव्दारे ग्रामसेवक व सरपंचाने स्वतः ग्रामसेवक व इतरांच्या नावे पैसे उचलून शासकीय पंचायत समिती केज रक्कमेचा अपहार केलेला आहे. सदरील काम अर्धवटच आहे ते लेंटल लेव्हल पर्यंत काम असतांना पण पूर्ण पैसे ग्रामसेवकाने उचलून शासकीय रक्कमेचा अपहार केलेला आहे. ग्रामनिधीच्या खात्यावर दिनांक 14.12.2021 रोजी 759 रुपये शिल्लक राहिलेली होती म्हणजेच व्यायामशाळा बांधकामाचे जमा झालेले सर्व पैसे उचलण्यात आले हे सिद्ध होते व्यायामशाळा बांधकाम पूर्ण न करता शासन निर्णयाप्रमाणे ते काम पूर्ण न करताच स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करुन शासकीय रक्कम उचलण्यात आली व अपहार करण्यात आला ही ग्रामसेवक यांची ही कृती शासन निर्णयाचा विरोधात असल्यामुळे शासकीय कामात हलगर्जीपणा निष्काळजीपणा, शासकीय रक्कमेचा अपहार केल्याबद्दल ग्रामसेवक यांना जबाबदार धरून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक ) नियम 1979 कलम 3 भंग केल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त) अपिल 1979 नूसार ग्रामसेवका विरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी लव्हुरी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्या कडे केली आहे. या निवेदनावर पंडीत वसंतराव चाळक,कैलास सुरेश चाळक,वैभव विक्रम चाळक,दत्तात्रय राजेंद्र चाळक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
