बीड : जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कोरोना कालावधीत कोट्यावधी रूपयांचा कागदोपत्रीच खरेदी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी आधिकारी-कर्मचा-यांनी नातेवाईकांच्या नावे बोगस एजन्सीच दाखवुन सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल विविध सामाजिक संघटना, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते यांनी निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा उपसंचालक डाॅ.एकनाथ माले व जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे गैरव्यवहार प्रकरणात चौकशी टाळणे तसेच तक्रारदारांना अहवाल देण्यास जाणीवपुर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.९ मे सोमवार रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे “अंधेर नगरी चौपट राजा “या म्हणीचा प्रत्यय येत असून डोळ्यावर काळी पट्टी बांधून निषेधार्थ लाक्षणिक धरणे करण्यात येत आहे. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन,काॅक्रीट. भाऊराव.क.प.नेते काॅ.भाऊराव प्रभाळे, भा.क.प.नेते मोरे रामहरी,वाटमोडे श्रीहरी सहभागी आहेत. जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
आरोग्य विभागातील भ्रष्टाचार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल उपसंचालक, जिल्हाशल्यचिकित्सक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा ; डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
RELATED ARTICLES