HomeUncategorizedएचपीएम कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.!

एचपीएम कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.!

केज : येथील भवानी चौकात ट्रक ,ट्रॅक्टर व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र तिहेरी अपघात घडला आहे .यामध्ये बुलेट वरील दोघेही जागीच ठार झालेले आहेत .या अपघाताला एचपीएम कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत .मिळालेल्या माहितीनुसार ऊस वाहतूक करणारा ट्रक हा धारुर कडून भरधाव वेगाने आला .तो सरळ ट्रॅक्टरवर आदळून नंतर बुलेटला धडक देऊन पलटी झाला असल्याचे सांगितले जात आहे . बुलेट वरील दोघेही तरुण ट्रकखाली दबले ट्रक खाली अडकलेल्या तरुणांना काढण्यासाठी तातडीने क्रेन मागविण्यात आले .क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजुला सारुन तरुणांना काढण्यात आले परंतु तोपर्यंत ते दबून जागीच ठार झाले होते.दोघेही केज शहरातील रहिवासी असून शेख जुबेर आसेफ , कुरेशी शहेबाज नसीर अशी नावं असल्याची प्राथमिक माहिती आहे . अंबाजोगाई –केज – मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गाचे काम एचपीएम कंपनी धिम्या गतीने करत असल्याने अर्धवट कामामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे . नियोजन शून्य कामकाजामुळे दररोज या रस्त्यावर छोटेमोठे अपघात होत आहेत म्हणून जनतेतून या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनी बाबतीत मोठी नाराजी आहे. या कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा म्हणून तहसील कार्यालया समोर मोठी गर्दी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments