HomeUncategorizedआ.क्षीरसागरांनी घेतला चालू कामांचा आढावा.!

आ.क्षीरसागरांनी घेतला चालू कामांचा आढावा.!

बीड : काही दिवसांपूर्वी राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांनी बीड शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात बैठक बैठक घेऊन आवश्यक ती कामे सुरू करण्याचे निर्देश दिले होते.या अनुषंगाने आज रविवारी (दि.८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.तसेच शहरातील भाजी मंडईतील व्यापार्‍यांशी चर्चा केली.बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत स्थानिक ते मंत्रालयीन पातळीवर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.यातूनच राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सर्व संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांची बैठक घेऊन आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले होते.या कामांना सुरू झाली असून ती लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.या कामांचा आढावा घेण्यासाठी आज रविवारी (दि.८) रोजी ईट येथील पाणी पुरवठा प्रकल्प येथील सुरू असलेली कामे तसेच ईदगाह नाका व नाळवंडी नाक्यावरील पाण्याच्या टाकीचे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली व संबंधितांना सुचना व निर्देश दिले.यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांच्या समवेत माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनील धांडे, पाणीपुरवठा व नगरपरिषद विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

स्मार्ट भाजी मंडईतीच्या अनुषंगाने व्यापार्‍यांशी चर्चा

शहरातील संस्कार विद्यालय येथील नवीन भाजी मंडई व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जुनी भाजी मंडई या दोन्हींच्या विकासकामांसाठी आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने ५ कोटी रुपयांच्या भरघोस निधी ला प्रशासकीय मान्यता मिळालेली असून या कामांना प्रत्यक्षात लवकरच सुरूवात होणार आहे.स्मार्ट सिटीच्या धर्तीवर बीड येथील भाजी मंडई स्मार्ट म्हणजेच अत्याधुनिक होणार आहे.या भाजी मंडई सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहेत.बीडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्जंतुक व निरोगी भाजीपाला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.आज रविवार (दि.८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही मंडईतील व्यापारी,फळे विक्रेते व भाजी विक्रेते यांच्याशी चर्चा केली,त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व सुरू होणार्‍या कामाच्या अनुषंगाने त्यांना अपेक्षित असलेल्या बाबी समजून घेतल्या.यावेळी शहरातील दोन्ही भाजी मंडईचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून दोन्ही भाजी मंडई अत्याधुनिक व सोयी-सुविधांनी परिपूर्ण असणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments