HomeUncategorizedगुंगीचे औषध देऊन लुटणार्या मामा भाच्याला पोलीसांनी केले गजाआड.!

गुंगीचे औषध देऊन लुटणार्या मामा भाच्याला पोलीसांनी केले गजाआड.!

केज : येथील एका ६६ वर्ष वयाच्या वृद्धाला थंड पेय आणी केळीमधुन गुंगी येणारे औषध खायला व प्यायला देऊन त्याच्या हाताच्या बोटातील ६० हजाराच्या रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या अज्ञात इसमाने लांबविल्या होत्या. त्या प्रकरणातील आरोपी मामा भाच्याला ताब्यात घेत त्यांनी काढून घेतलेल्या दोन्ही अंगठ्या पोलिसानी हस्तगत करून अत्यंत आव्हानात्मक तपास पूर्ण केला आहे.या बद्दल केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या घटनेची सविस्तर माहिती अशी की दिनांक ५ एप्रिल मंगळवार रोजी केज तालुक्यातील बनकरंजा येथील श्री. धर्मराज थोरात हे कानडी रोड वरच्या विजय भन्साळी यांच्या विजय कृषी सेवा केंद्राच्या समोर थांबले असता सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० वाजण्याच्याचा दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीच्या मुलीची सोयरीक जुळवायची आहे.अशी बतावणी केली पाहुणे येई पर्यंत चहापाणी पिण्याचा बहाना केला.धर्मराज थोरात यांना त्या अनोळखी व्यक्तीने स्प्राईट या थंड पेयाच्या बाटलीत गुंगी येणारे औषध मिसळून ते प्यायला दिले. तसेच त्यांनी केळी मध्ये पण गुंगी येणारे औषध खायला दिले. नंतर ते दोघे कानडी रोड वरुन क्रांती नगर जवळच्या केजडी नदी मधुन पाटलाचे शेतात गेले. तेथे गेल्या नंतर धर्मराज थोरात यांना गुंगी येताच त्याचा गैरफायदा घेऊन त्या अनोळखी ठगाने धर्मराज थोरात यांच्या उजव्या हाताच्या बोटातील प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या जुन्या दोन अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला होता.दरम्यान दिनांक १ मे रोजी एका गुप्त खबऱ्याने नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास जाधव यांना एका संशयित इसमाची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव आणी तपासी अधिकारी राम यादव यांनी राजेंद्र बिरू लांडगे संशयित इसमास ताब्यात घेतले आणी त्या नंतर त्याचा भाच्चा अमोल गोविंद सोनटक्के यालाही ताब्यात घेतले.दिनांक ७ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस अंमलदार राम यादव आणी पोलीस नाईक अमोल गायकवाड यांनी अटकेतील आरोपींनी दिलेल्या माहिती आधारे अधिक तपास करून औसा येथील एका रोहिणी अलंकार मध्ये त्यांनी अंगठ्या विकल्या असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस अंमलदार राम यादव आणी पोलीस नाईक अमोल गायकवाड आणी औसा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांच्या मदतीने सर्व मुद्देमाल हस्तगत केला.यामुळे केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सीसीटीव्हीचे फुटेज ठरले महत्त्वाचे :- तपासी अंमलदार राम यादव यांनी कानडी रोडवरील मयुरपारस स्वीट होम मधील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून ते बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील तपास यंत्रणेला पाठवून सतर्क केले होते. पोलिस यंञणेच्या सतर्कतेमुळे तपास चक्रे योग्य दिशेने करुन प्रकरणाचा छडा लावल्याबद्धल पोलिस कर्मचारी व अधिकारी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments