HomeUncategorizedभ्रष्टाचार विरोधी प्रसारच्या राज्य उपाध्यक्षपदी ; पञकार महेशकुमार जगताप यांची निवड.!

भ्रष्टाचार विरोधी प्रसारच्या राज्य उपाध्यक्षपदी ; पञकार महेशकुमार जगताप यांची निवड.!

केज : तालुक्याचे भुमीपुञ पञकार श्री. महेशकुमार जगताप यांची भ्रष्टाचार विरोधी प्रसार संस्थेच्या राज्य उपाध्यक्ष पदावर नीवड झाली असुन त्यांचे सर्व स्तरातुन स्वागत होत आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेला अन्याय, अत्याचार व भष्ट्राचारावर विरोधी प्रसार करून लढा उभा करून पिडीतांना न्याय मिळवुन देण्यासाठी राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था महाराष्ट्र,बीड जिल्ह्यातील पञकार श्री. महेशकुमार जगताप यांची राज्य उपाध्यक्ष पदी निवड केल्याचे नियुक्ती पत्राद्वारे झाली आहे.राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था महाराष्ट्र यांनी महेशकुमार जगताप यांनी गेल्या २० वर्षा पासुन पत्रकारीतेच्याकार्यकाळात आपल्या निर्भिड लेखनीच्या माध्यमातुन अन्याय,अत्याचार व भ्रष्ट्राचार प्रकरणी सतत वृत्त प्रकाशीत करून व व्यक्तीश: शासन दरबारी तक्रारी,लढा देऊन अनेक पिडीत ग्रस्तांना न्याय मिळवुन दिला आहे.बीड जिल्ह्यातील रेशनचा काळाबाजार,पिकअनुदान,जि.प बीडचा संगणक अनाधिकृत सॉफ्टवेअर घोटाळा,पिक अनुदान सह अनेक प्रकरणात तालुका तहसील ते मंत्रालय मुंबई पर्यत तक्रारी,आवाज उठवल्याने महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदमध्ये तात्कालीन आमदार मंगेश सांगळे, सुरेश नवले,अमरसिंह पंडीत सह ईतर आमदारांनी तारांकित प्रश्न,लक्षवेधी उपस्थीत केल्याने चौकशी अंती राज्य शासनाने दोषी विरूद्ध राज्य शासनाने काही प्रकरणी दंडात्मक तथा निलंबनाची कठोर कारवाई केली होती.तर शेतकरी पिक नुकसान अनुदान तात्काळ शेतक्याच्या खात्यावर रक्कम वर्ग करून न्याय मिळवुन दिला होता. राष्ट्रीय जनकल्याण सेवा संस्था महाराष्ट्र राज्य (भारत) ने वरिल प्रकरणाची दखल घेउन महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्षपदी निवड केल्याचे नियुक्ती पत्र राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.धनंजय तळेकर महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रदिप पाठक व महिला कार्याध्यक्ष मा.लक्ष्मी भालेराव यांनी कळवत यापुढील कार्यकाळात अन्याय,अत्याचार व भ्रष्ट्राचार विरोधी प्रसार करून पिडीतांना न्याय मिळवुन देण्याची अपेक्षा व्यक्त करत शुभेंच्छा दिल्या आहेत.पदाला न्याय मिळवुन देणार-महेशकुमार जगताप.यापुर्वी प्रमाणेच पुढील काळातही राज्यातील दैनंदिन वाढते महिलावरील अन्याय व अत्याचार या प्रकरणी गांभिर्याने दखल घेऊन शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवुन न्याय मिळवुन देणार व भ्रष्टारावर अंकुश निर्माण करण्यासाठी राज्यभरात भ्रष्ट्राचार विरोधी प्रसार करू.कोणाच्या काही व्यक्तीश:तक्रारी असतील तर लेखी पुराव्यासह संस्थेला कळवले तर नक्कीच न्याय मिळवुन दिला जाईल.ईमेल- [email protected] किंवा मो.9112798905 वरती कळवावे.छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती राजश्री शाहु महाराज,क्रातीज्योती महात्मा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा समतेच्या संदेश व शिका संघटीत व्हा व संघर्ष करा हा संदेश कृतीत आणुन सर्वांच्या प्रश्नांना न्याय मिळवुन देण्यार असे महेशकुमार जगताप यांनी बोलतांना सांगीतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments