केज : बीड रोडवर लोखंडी जैक रस्त्यावर टाकून प्रवाशांची लुट करुन मारहाण पोलीसांकडून शोधकार्य वेगाने सुरु,वाहन अडवून चाकूचा धाक दाखवून नगदी रकमेसह पाऊण लाखाचा मुद्देमाल लंपाससात ते आठ चोरटे असल्याचा संशय , घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची भेट .श्वान पथकाची पोलीसांनी घेतली मदत.केज बीड रोडवर पहाटे ४- ०० वाजण्याच्या सुमारास रस्त्यात रस्त्यावर जॅक आडवा टाकून वाहन अडवून चाकुचा धाक दाखवून नगदी ४९ हजार रुपये आणी २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.या प्रकारानंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी भेट दिली. तसेच या प्रकरणी चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक घटनास्थळी पाचारण करून गुन्हेगारांचा मग काढण्याचा प्रयत्न केला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की, दि.७ मे शनिवार रोजी पहाटे ४:०० वाजता लातूर जिल्ह्यातील निवाडा ता. रेणापूर येथील लक्ष्मीकांत विश्वनाथ आप्पा उरकुंडे हे अहमदनगर येथील कार्यक्रम आटोपून निवाडा येथे जात असताना केज-बीड रोडवर पिंपळगाव फाट्या पासून पुढे मस्साजोग शिवारात रस्त्यावर वाहनांचा लोखंडी जॅक टाकला तो जॅक पाहून लक्ष्मीकांत उरकुंडे यांच्या वाहन चालकाने त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला थांबविली. गाडी थांबताच सात ते आठ अनोळखी इसम गाडीजवळ आले त्यांनी गाडीच्याचालकाला उचलून रस्त्या जवळच्या शेतात नेऊन काठीने मारहाण केली.तसेच लक्ष्मीकांत उरकुंडे यांनाही मारहाण केली.त्यांना चाकूचा धाक दाखवून दोघांच्या कडील २५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणी नगदी ५९ हजार रुपये पळविले.या प्रकरणी लक्ष्मीकांत उरकुंडे यांच्या तक्रारी वरून दिनांक ७ मे रोजी अनोळखी चोरट्या विरुद्ध गु.र.न१६१/२०२२ भा.दं.वि. ३९५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शंकर वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यांची भेट :-घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.पंकज कुमावत यांनी भेट दिली आणी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना सूचना दिल्या.श्वान पथकाला पाचारण :-या वाटमारीची सखोल तपास करून चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलीसांनी श्वान पथकाला पाचारण केले आणी तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे.लवकरच चोरटे जेरबंद होतील असा विश्वास जनतेच्या वतीने व्यक्त केला जात आहे.
लोखंडी जैक रस्त्यावर टाकून प्रवाशांची लुट करुन मारहाण ; पोलीसांकडून शोधकार्य वेगाने सुरु.!
RELATED ARTICLES