केज : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन ईमारतीमध्ये अग्नीशामक यंञणा कार्यन्वीत करण्यात आली असुन आपतकालीन परिस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजना वर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी आग लागल्यावर आग कशी विझवायची याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले.यावेळी केज न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री .बी.एस.संकपाळ यांच्यासह कर्मचारी व वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते .यावेळी अग्नीशामक सिलेंडरचे सील काढुन सिलेंडर उजव्या हाताने पकडून डाव्या हाताने पाईप पकडून सिलेंडर मधील गॕस चालु करावा तसेच शाॕटसर्किट होत असेल तर प्रथम अग्नीशामक सिलेंडरच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणावे .विद्युत पुरवठा बंद करुनच पाण्याचा वापर करावा असे मार्गदर्शन करण्यात आले.त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण करता येते असे सांगण्यात आले.न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिक करुन आग नियंञणात आणण्याचे प्रात्यक्षिक यशस्वीपणे साध्य केले .
