केज : तालुक्यातील लव्हरी ग्रामपंचायत आधीपासून भ्रष्टाचाराच्या चर्चेने गाजलेली असतानाच पून्हा एकदा पुर्वी झालेल्या रस्त्याच्या कामाची मंजुरी आणून प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकून बील उचलण्याची तयारी करण्याचा केविलवाणा प्रयत्न ग्रामपंचायत कडून केला जात आहे.याविषयी सविस्तर वृत्त असे की,लव्हुरी,ता.केज येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत,१)लव्हुरी ते कोठी रस्ता, लव्हुरी ते तरनळी रस्ता या रस्त्यांना मंजुरी देऊन रस्ते हे २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये पूर्ण झालेले आहेत, सदरील रस्त्याचे काम पूर्ण होऊन कामाचे पुर्णत्वाचे दाखले (camplition certificate) मनरेगा च्या वेबसाईट वर अपलोड केलेले आहेत.तरी पण ग्रामपंचायत कार्यालय लव्हरी यांनी त्याच रस्त्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवून शासनाची फसवणूक केलेली आहे.सदर ग्रामपंचायतीच्या प्रस्तावास शासनाने शासन निर्णय दिनांक २५-०१-२०२२ व दिनांक ०३-०३-२०२२ नुसार१,लव्हुरी ते कोठी रस्ता भाग १,२) लहुरी ते कोठी रस्ता भाग २,३) लव्हुरी ते तरनळी रस्ता या कामासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. सदरील रस्त्याचे२०१५-१६ व २०१६-१७ मध्येच मातीकाम,खडीकरण, मुरूम टाकणे,दबई हे सर्व कामे पूर्ण होऊन त्याचे देयक पंचायत समिती कार्यालयामार्फत अदा करण्यात आलेले आहेत. तरी पण ग्रामपंचायतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे रस्ता कामांना मंजुरी आणून शासनाची फसवणूक केलेली आहेएखाद्या कामास त्याच योजनेतून मंजुरी मिळून काम पूर्ण होऊन देयक सादर झालेले असल्यास त्याच कामावर त्याच योजनेतून निधी खर्च करता येतो का? लव्हूरी ग्रामपंचायत मध्ये यापूर्वी पण असेच मनरेगा अंतर्गत बोगस कामाच्या आधारे तब्बल १८लक्ष रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असा अहवाल जि प च्या स्त्री त्रिस्तरीय समितीने दिलेला आहे. सदर प्रकरणाची याचिका मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे सुरू आहे. तरी मा.साहेबांनी याचा आपण गांभीर्याने विचार करावा प्रत्येक योजना प्रस्ताव तयार करताना सदरील काम हे कोणत्याही योजनेतून पूर्ण झाले नाही हे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने आवश्यक असते मग तसे प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे का? जर देण्यात आलेली असेल तर ग्रामसेवक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक,पंडीत चाळक, दत्तात्रय चाळक,उमेश चाळक,कृष्णा चाळक, विक्रम चाळक यांच्यासह गावातील नागरिकांनी मुख्य कार्यकारीअधिकारी बीड यांच्याकडे तक्रार केली आहे.
लव्हुरी ग्रामपंचायत कडून पुर्ण झालेल्या कामाचा पुन्हा मंजुरी आणून बील हडपण्याचा प्रयत्न.!
RELATED ARTICLES