मुंबई : कृषि पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या सन २०१८ यावर्षीपासून राज्य सामाईक प्रवेश परिक्षा (सीईटी) लागू करण्यात आली आहे. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, अधिसूचना दि. १५/१/२०१८ तसेच कृषि परिषदेचा ठराव क्र.३७/९३/२०१७ ला अनुसरून महाराष्ट्रातील सर्व कृषि पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षात प्रवेशासाठी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून १२वी विज्ञान (PCBM) सह राज्य सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET) अनिवार्य आहे. मात्र MHT-CET ऐवजी JEE/ NEET यापैकी कोणतीही सामाईक प्रवेश परिक्षा ग्राहय धरण्यात येईल.सन २०२०-२१ प्रवेश प्रक्रिये दरम्यान असे निदर्शनास आले आहे की, असंख्य विद्यार्थी हे बी.टेक (फूड टेक्नॉलॉजी), बी.एस्सी. ऑनर्स. (अॅग्री) बी. टेक (कृषि अभियांत्रिकी), बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.एस्सी. (उद्यानविद्या), बी.एस्सी. (कृषि व्यवसाय व्यवस्थापन), बी.एस्सी. (समुदाय विज्ञान), बी.एस्सी. (मत्स विज्ञान), बी.एस्सी. (वनशास्त्र) या पदवीस प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. परंतू राज्य सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET) ही दिलेली नसल्यामुळे त्यांना या पदवी प्रवेशास पात्र राहता आले नाही आणि त्यांचे एक वर्षाचे शैक्षणीक नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या सन २०२२-२३ प्रवेश प्रक्रियेत अशा पद्धतीचे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून १२वी विज्ञान (PCBM) विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावीराज्य सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET) राज्य सामायिक प्रवेश परिक्षा कक्षाकडून (CET Cell) विविध सीईटी परिक्षांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता दि. ११/०५/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज विलंब शुल्कासह नोंदणी अर्ज भरता येणार आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी असेही सीईटी सेलने स्पष्ट केलेआहे. या बाबतचे वेळापत्रक, माहिती पुस्तिका व प्रक्रिया या विषयी माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी सर्व विद्याथ्र्यांनी ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरून घ्यावेत.या सामाईक प्रवेश परिक्षेविषयी (MHT-CET) अधिक माहितीसाठी सौ.के.एस.के. (काकू) अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय, म्हसोबा फाटा, नगर रोड, बीड येथे संपर्क करावा संपर्क- ९४२००२५०५२, ९८२२७७५२५५, ९६५७५७६४१८, ८३०८६५३०२३.
१२वी सायन्स विद्यार्थ्यांना बी.एस्सी ॲग्री आणि बी.टेक. (फूड टेक.) प्रवेशाच्या स्वतंत्र MHT-CET अर्जासाठीमुदतवाढ.!
RELATED ARTICLES