HomeUncategorizedधनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यास मोठे यश.!

धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यास मोठे यश.!

मुंबई : परळी मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिकचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे करत असलेल्या पाठपुराव्यास मोठे यश आले असून, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज परळी मतदारसंघातील प्रस्तावित 23 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्पांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने देऊन त्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी विभागाला दिले आहेत.जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीस सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आ. संजयभाऊ दौंड, मा. आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत परळी मतदारसंघातील गोदावरी नदी वरील तारू गव्हाण बॅरेज अंबलवाडी प्रकल्प (उपसा सिंचन), अंबालवाडी, वसंत नगर, कासारी, गोवर्धन तांडा, वैतागवाडी, वाका, पडोली, रेवली, कन्हेरवाडी या दहा साठवण तलावांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देऊन मंजुरी देण्याचे निर्देश ना. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रस्तावित यादीतील उर्वरित 13 प्रकल्पांच्या तांत्रिक बाबी तपासून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देशही विभागास दिले आहेत.धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात सामान्य शेतकरी कष्टकरी वर्गाचे उत्पन्न वाढवुन त्यांचे राहणीमान उंचावण्याचा शब्द विधानसभा निवडणुकीत दिला होता. कमी पाऊस व सिंचनाच्या मर्यादित सोयी असलेल्या या क्षेत्रात सिंचनाच्या मुबलक सोयी उपलब्ध झाल्याने या भागातील शेती क्षेत्रात उत्पन्न वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात भरारी घेऊ शकणार आहे, यासाठी धनंजय मुंडे यांनी ‘मराठवाड्याचे भगीरथ’ ना. जयंत पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत.

परळी मतदारसंघातील विविध जलसिंचन प्रकल्पांच्या संदर्भात जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments