बीड : रमजान ईद निमित्त भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी आयोजित केलेल्या ईद मिलाप कार्यक्रमात संत महंतांनी उपस्थिती दर्शवून राष्ट्रीय एकात्मतेसह भाई चाऱ्याचा संदेश दिला. संत महंतांसह मुस्लिम समाजातील धर्मगुरू आजी – माजी आमदार , विविध राजकीय – सामाजिक संघटनांचे पदाधिकारी , व्यापारी, पत्रकार, वकील , डॉक्टर्स , इंजीनियर्स आणि सामान्य नागरिकांच्या उपस्थितीने ईद मिलाद कार्यक्रमाला चार चाँद लावले. संत महंतांसह मुस्लिम धर्मगुरू आणि मान्यवरांच्या मांदियाळीने ईद मिलाप कार्यक्रम खऱ्या अर्थाने सामाजिक आणि धार्मिक मिलाप घडविणारा ठरला. उपस्थित मान्यवरांनी सलीम जहाँगीर यांच्या या कार्यक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. समाजात अशा पद्धतीने मिलाप घडवून आणणाऱ्या कार्यक्रमांची गरज असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केला.बीड जिल्हा भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी मंगळवार दि. 3 मे रोजी रमजान ईद निमित्त गजानन नगर भागातील त्यांच्या निवासस्थानी ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास श्री. क्षेत्र नारायण गड संस्थानचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, श्री. क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे महंत ह.भ.प. नवनाथ महाराज , पटांगण संस्थानचे वेद शास्त्र संपन्न धुंडिराज शास्त्री पाटांगणकर महाराज , बंकट स्वामी संस्थान नेकनुरचे महंत ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे, , ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज मंजेरी येथील रामगड संस्थानचे ह.भ.प. योगीराज महाराज धांडे , ह.भ.प.नाना महाराज, ह.भ प.सुरेश महाराज या संत – महंतांसह सीए. बी.बी.जाधव आतिरिक्त पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार , आ. संदीपभैय्या क्षीरसागर , माजी मंत्री सुरेशराव नवले , माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर , माजी आ. राजेंद्र जगताप ,लोकशा संपादक विजय बंब , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के , शिव सेनेचे नेते कुंडलिक खांडे ,बीड शहर पोलिस निरक्षक रवी सानप , भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रा देविदास नागरगोजे , कोशाध्यक्ष चंद्रकांत फड ,पेठ बीड पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक पालवे,रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे , अशोक हिंगे,प्रा. सुशीलाताई मोराळे , ऍड. सुभाष राऊत विलास बामणे , दत्ता परळकर यांच्यासह आजी – माजी नगरसेवक , राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी , व्यापारी, पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे जहाँगीर परिवाराच्या वतीने सलीम , अलिम , कलीम जहाँगीर, आजिज, तकी,अनिस,आसिफ यांनी स्वागत केले.चौकट – *सलीम जहाँगीर यांनी घडवून आणला मिलाप*बीड जिल्ह्यातील पहिलाच ईद मिलाप कार्यक्रम सलीम जहाँगीर यांनी ईदच्या दिवशी आयोजित केला. विशेष म्हणजे या कार्यक्रमातुन सलीमभाईंनी संत – महंत यांना निमंत्रित करून खऱ्या अर्थाने मानवतेचा मिलाप घडवून आणला. जाती – धर्माच्या पलीकडे जावून मानवता हाच खरा आणि सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे चित्र सलीम जहाँगीर यांच्या ईद मिलापमधून पाहायला मिळाले. संत – महंतांसह मान्यवरांनी सलीम जहाँगीर यांच्या उपक्रमाचे कौतुक करत जहाँगीर कुटुंबियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
