केज : तालुक्यातील सोनिजवळा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.केज तालुक्यातील सोनिजवळा येथील भाजपाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करुन,भाजपलाजोरदार धक्का दिला आहे. बजरंग बप्पा सोनवणे यांचे खंदे समर्थक सरपंच मुकुंद गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब कोकाटे, गोविंद ससाणे ,हमिद पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सोनिजवळा येथील अभिमान ससाणे, रामभाऊ ससाणे, बालासाहेब कोकाटे, सतिश ससाणे,सोमनाथ कोकाटे,यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधे जाहीर प्रवेश घेतला आहे.यावेळी बजरंग बप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे काम करुन येणाऱ्या निवडणुकीत बजरंग बप्पा सोनवणे यांना सोनिजवळा येथुन जास्तीत जास्त मताधिक्य देवून सहकार्य करणार असल्याचे प्रवेश करताना सांगितले.बजरंग सोनवणे यांचे नेतृत्व म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देणारे आहे तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, व्यथा, तक्रारी,चे तात्काळ निरसन करणारे, गरीब श्रीमंत, जातीचे राजकारण कधीही न करणारे तसेच सर्वांना योग्य न्याय देणारे नेतृत्व असल्याचे प्रवेशकर्त्यानी सांगितले, तसेच स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींची जवळून जाण असणारे नेतृत्व म्हणजे बजरंग सोनवणे आहेत अशा या शेतकरी पुत्राच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी उपलब्ध झाली यातच आम्हाला आनंद आहे येणाऱ्या निवडणूकीत तन,मन,धनाने बजरंग बप्पांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून प्रचंड मताधीक्य देवून बप्पांना सहकार्य करू अशी भावना प्रवेशकर्त्यानी व्यक्त केल्या.यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते .
सोनिजवळा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश.!
RELATED ARTICLES