केज : तालुक्यातील जिवाचीवाडी येथे एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने गळफास घेउन आत्महत्या केली आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,दिनांक ३ मे रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातीलजिवाचीवाडी येथे कु.प्रणिता निळकंठ चौरे वय १६ वर्ष इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्यातील विडा बिटचे पोलीस नाईक उमेश आघाव आणी बाळराजे सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कार्यवाही केली. दरम्यान प्रणिता चौरे हिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या.!
RELATED ARTICLES