HomeUncategorizedहिंदू-मुस्लीम एकोप्याचं अनोखं दर्शन ; हिंदू बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट.!

हिंदू-मुस्लीम एकोप्याचं अनोखं दर्शन ; हिंदू बांधवांकडून मशिदीला भोंगा भेट.!

बुलडाणा : देशभरासह महाराष्ट्रात आज ‘ईद-उल-फित्र’ म्हणजेच ‘रमजान ईद’ साजरी केली जात आहे. सर्व मशीद आणि ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी लोक जमले आहेत. लोक एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच महाराष्ट्रात भोंग्यावरून राजकारण तापलं असतानाच, बुलडाणा जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम एकोप्याचं एक अनोखं दर्शन घडलं आहे. बुलडाणा तालुक्यातील केळवद गावात हिंदू बांधवांनी गावातील मशिदीला लाऊड स्पीकर म्हणजेच भोंगा भेट दिला आहेएकीकडे राज्यात भोग्यांवरून राजकारण तापलं असताना सामाजिक सलोखा जपत केळवद गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील मशिदीला भोंगा भेट देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध केला. अवघ्या 5 हजार लोकसंख्या असलेल्या केळवद गावात मुस्लिमांची फक्त 3 टक्के संख्या आहे. गावात एक मशीद असून या मशिदीवर अजूनही भोंगा नव्हता, हीच बाब लक्षात घेता गावातील हिंदू बांधवांनी एकत्र येत गावातील मशिदीला भोंगा भेट दिला. यावेळी गावातील सरपंचासह असंख्य गावकऱ्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला.या देशात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी तसेच महागाईसारखे असंख्य मुद्दे आहेत. त्यावर प्रकाश टाकण्याऐवजी राज ठाकरे हनुमान चालीसाच्या नावाखाली बहुजनांचे माथे भडकवत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. इतकंच नाही तर, राज ठाकरे सुपारी घेऊन राज्यात दंगली घडविण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोपही केळवदच्या ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments