बीड : जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र निमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नागरिकांनी हा सण आनंदाने व शांततेच्या वातावरणात साजरा करावा असे आवाहन केले आहे .समाजात शांतता बंधुभाव व बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हा उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी यावा अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.रमजान ईद चा सण आनंदात व शांततेत साजरा करावा अशा शुभेच्छा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या. सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी. देशात व राज्यात घडणार्या विविध बाबींचा अनुषंगाने जिल्ह्यातील सामाजिक शांतता बिघडू नये याकडे पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. समाज विघातक घटकांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. असे पोलिस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे
जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांच्याकडून ईद-उल-फित्र निमित्त नागरिकांना शुभेच्छा.!
RELATED ARTICLES