HomeUncategorizedपिंपळादेवी सेवा सोसायटी वर शिवसंग्रामचा झेंडा

पिंपळादेवी सेवा सोसायटी वर शिवसंग्रामचा झेंडा

बीड : अटीतटीच्या झालेल्या पिंपळादेवी सेवा सहकारी सोसायटी निवडणूकीत जनशक्ती ग्रामविकास आघाडी ने शिवसंग्राम चे ज्येष्ठ नेते गोपीनाथ घुमरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मताधिक्क्याने १३ पैकी ११ जागेवर वर्चस्व मिळवत सोसायटीवर आपला झेंडा फडकवला आहे. या यशा बद्दल शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांनी शिवसंग्राम भवन येथे सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे पाटील, मनोज जाधव, विजय सुपेकर, शेषेराव तांबे आदी उपस्थित होते.पिंपळादेवी सेवा सोसायटी विजयी उमेदवारांचे स्वागत करत असताना आ. मेटे म्हणाले की ग्रामीण विकासाचा मुख्य गाभा सेवा सोसायटी आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती निगडीत सुविधा उपलब्ध करून देत त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे काम या द्वारे केले जाते येणाऱ्या काळात सर्वच निवडणुका ताकतीने लढवत सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला जी काही मदत लागेल ती मी सदैव करण्यास तत्पर राहील. या निवडणुकीत सर्वसाधरण प्रवर्गातील कासट बालाप्रसाद भगीरथ,गायकवाड दत्ता नानाभाऊ,घुबडे दगडूू लक्ष्मण,घुमरे अशोक सखाराम,घुमरे गणेश गोपीनाथ,घुमरे पंडितराव बाबुराव,घुमरे प्रदीप त्रिंबकराव,घुमरे मोहन दिगंबरसह इमावचे जातीचे निशिकांत शाहूराव गायकवाड, महिला प्रतिनिधी मिराबाई बाळासाहेब घुमरे, कमलबाई शेषेराव घुमरे विजयी झाले आहेत.सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मताधिकार प्रक्रिया पार पडली, सायं. 5.30 वाजेपर्यंत मतमोजणी होऊन निकाल घोषीत झाला. या वेळी मतदान केंद्र बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, शांतेत मतदान प्रक्रिया पार पडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments