गेवराई : मुस्लिम समाजाच्या पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यानिमित्त शिवछत्र परिवाराच्या वतीने गेवराई येथेआयोजित केलेल्या रोजा ईफ्तार पार्टीला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकासोबत हिंदु समाजातील नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबूब, जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, पृथ्वीराज पंडित.यांनी उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकात्मतेचा संदेश दिला.रमजान महिन्यानिमित्त शिवछत्र परिवाराच्या वतीने रविवार दि, १ मे रोजी गेवराई शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक एकता आणि स्नेह जपण्याच्या संदेश देणाऱ्या या इफ्तार पार्टीला मुस्लिम समाजातील नागरिकांसोबत हिंदू समाजातील नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.यावेळी शिवछत्र परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. हिंदू आणि मुस्लिम समाजातील एकत्मतेच यावेळी दर्शन होत होते. या प्रसंगी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

