HomeUncategorizedशिवसंग्राम संघटनेतील केज व अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पदाधिक-यांचा कार्यमुक्तीचा...

शिवसंग्राम संघटनेतील केज व अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पदाधिक-यांचा कार्यमुक्तीचा निर्णय ; नारायण काशिद.!

बीड : शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसंग्रामचे बीड जिल्हाध्यक्ष मा. नारायण काशिद यांनी केज व अंबाजोगाई तालुक्यातील व जिल्हा कार्यकारणीतील आणि अंगीकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी यांना कार्यमुक्त केले आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका सर्व ताकतीनिशी लढण्यासाठी केज व अंबाजोगाई तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्व तालुका व जिल्हा कार्यकारणीतील पदाधिका-यांना कार्यमुक्त करून नवतरूणांना पक्ष संघटनेत महत्वाच्या जबाबदा-या देवुन मा. आ. विनायकरावजी मेटे यांचे विचार व शिवसंग्रामचे ध्येय धोरण गावोगावीपोहोचविणे व गावागावात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्षसंघटनेत फेरबदल करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने वरिल निर्णय घेण्यात आलेला आहे_असा निर्णय घेण्यात आला.लवकरच सर्व कार्यकर्त्यांशी व आजी माजी पदाधिका-यांशी सखोल चर्चा विनिमय करून नविनपदाधिका-यांची नियुक्ती करण्यात येणार आहेत. या साठी दिनांक १५.०५.२०२२ रोजी केज व अंबाजोगाई या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.अशी माहिती शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काशीद यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments