केज : मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महीण्यामध्ये मुस्लिम समाजातील लहान,मोठे वयोवृद्ध लोक रोजा ठेवतात.या पवित्र महीण्यात मुस्लिम समाज मोठ्या आदराने अल्लाहची प्रार्थना करुन गरवंताना मदत करतात.प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी केज पोलीस स्टेशनच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन मोठ्या थाटात करण्यात आले होते.रोजा ईप्तारसाठी आलेल्या मुस्लिम बांधवाना रोजा सोडण्यासाठी विवीध प्रकारचे फ्रुटसह अनेक खाद्य पदार्थ देऊन रोजा इफ्तार पार्टी संपन्न झाली. यावेळी सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री.पंकज कुमावत,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.शंकर वाघमोडे,जनविकास परिवर्तन आघाडी प्रमुख श्री.हारुणभाई इनामदार, नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्यासह नगरसेवकाची हजेरी लावली होती तसेच , पत्रकार,व्यापारी,तसेच समाजासह सर्वच जातीधर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.पोलीस कर्मचाऱ्यांनी रोजा ईप्तारपार्टीचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते.सहाय्यक पोलीस उप निरीक्षकश्री.संतोषमिसळे, पोलिस उपनिरीक्षक श्री. पाटील,पोलीस कर्मचारी श्री.अशोक नामदास,शेख मतीन,गुजर अप्पा,सय्यद अमजद,श्री.अहंकारे सह सर्वच कर्मचाऱ्यांनी मदत करून रोजा पार्टीचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने आयोजन करून उत्साहाने ईप्तार पार्टी साजरी करण्यात आली.
केज पोलीस स्टेशनच्या वतीने मुस्लीम बांधवाना रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम उत्साहाने साजरा.!
RELATED ARTICLES