केज : येथे जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा केज येथे उद्धवस्वामी ईनाम मैदानावर उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळी नऊ वाजता शिवाजी चौक येथून सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवाजी महाराज, झाशीची राणी, प्रभु रामचंद्र यांचे देखावे, भजनी मंडळ, कलशधारी महिला, निशाणधारी पुरुष इत्यादी विविध पथकांसह हजारो भक्तगण सहभागी झाले होते.सिद्ध पादुकांचे मिरवणूकीने सकाळी अकरा वाजता कार्यक्रम स्थळी आगमन झाले.तेथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्तगणांनी सिद्ध पादुकांचे भव्य स्वागत केले.या कार्यक्रमात १०७ गरीब व गरजू शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.याप्रसंगी आ.नमीताताई मुंदडा, सभापती विष्णू भाऊ घुले,नगराध्यक्ष सौ.सीताताई बनसोड ,जनविकास परिवर्तन आघाडीचे हारुणभाई इनामदार,मा.जि.प.सदस्य विजयकांत मुंडे हे मान्यवर उपस्थित होते.त्यानंतर सिद्ध पादुकांचे विधीवत गुरुपुजन संपन्न झाले.त्यानंतर जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या वरील प्रवचनकार ज्योतीताई पगारे यांचे प्रवचन झाले. प्रवचनकारांनी गुरुनिष्ठेचे महत्व विशद करून गुरुदेवांची व गुरुशक्तीची प्रचिती अत्यंत ओजस्वीपणे सांगितली.प्रवचनानंतर ३०० भाविकांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची उपासना दिक्षा घेतली.त्यानंतर महाप्रसाद, सांगता आरती व पुष्पवृष्टी संपन्न झाली व कार्यक्रमाची सांगता झाली.बीड जिल्ह्यातील वीस हजार भाविकांनी या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्व-स्वरूप संप्रदायाची जिल्हा सेवा समिती व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.यावेळी भक्त समुदाय मोठ्या संख्येने उपस्थीत होता.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा उद्धव स्वामी ईनाम मैदान केज येथे उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न.!
RELATED ARTICLES