केज : प्रमाणापेक्षा जास्त वाळु भरलेले हायवा टिप्पर आढळून आल्याने केज पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन शुक्रवारी सकाळी १२-०० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले असून पोलीस आणी महसूल प्रशासन पुढील कारवाई करत आहे.अवैध रेती वाहतूक करणारा हायवा एम एच १४-जीडी ९९१९हे माजलगाव कडून कळंब कडे जात असताना दिसून आल्याने सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शंकर वाघमोडे यांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचारी श्री.अशोक नामदास,श्री.जगजीवन करवंदे आणी चालक श्री. हनुमंत गायकवाड यांनी सदरील हायवा टिप्परचा पाठलाग करुन साळेगाव नजीक पकडण्यात आला. सदरील टिप्पर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अंबाजोगाई येथील आरटीओ कार्यालयाला त्याची माहिती दिल्यानंतर आरटीओने त्याचे वजन केले असता सात टन भरले आहे .त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वजन दिसून आल्याने ८२००० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर सदरील वाळू वाहतूक रॉयल्टी प्रमाणे आहे की नाही? याची तपासणी करण्यासाठी तहसील कार्यालयाला कळवण्यात आले आहे.दरम्यान, तहसीलदार रॉयल्टी वैध आहे की नाही याचा निर्णय तहसीलदार घेणार आहेत.परंतु सदरील प्रकरणामुळे जादा रेतीची वहातुक करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत .
प्रमाणाबाहेर वाळू वाहतूक करणारे हायवा टिप्पर केज पोलीसांनी पाठलाग करुन पकडले.!
RELATED ARTICLES