केज : येथील विठाई मंगल कार्यालयात नुकताच अॕड.चि.सुदर्शन व चि.सौ.का.दिपाली यांचा विवाह सोहळा समाजा समोर आदर्श ठेवणारा ठरला.विवाह संस्कार हा मानवाच्या जीवनातील पविञ क्षण आप्त,स्वकीय,मिञमंडळी व देव ब्राम्हण यांच्या साक्षीने गृहस्थाश्रमात प्रवेश करुन आदर्श जीवन जगण्यासाठी असलेला संस्कार होय.चि.सौ.का.दिपाली ही मुंडे परिवारातील अॕड.सौ.राजश्रीताई मुंडे यांचे बंधु कै.महादेव हांगे यांची सुकन्या लहानपणीच वडीलांचे दुखःद निधन झाल्याने अॕड.सौ.राजश्रीताई मुंडे यांनी कु.दिपालीच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.मुंडे परिवाराच्या छञछायेखाली अतिशय आनंदाने वाढत असताना कु.दिपाली ईयत्ता बारावी नंतर कायद्याची पदवी घेत आहे.तसेच अॕड.श्री.सुदर्शन यांनी ही नुकतीच वकीली व्यवसायास सुरूवात केली आहे. एकाच घरात दोघांचे बालपण गेले असुन एके दिवशी अॕड.श्री.नवनाथराव मुंडे व अॕड.सौ.राजश्रीताई मुंडे यांनी विचार विनीमय करुन श्रीमती अरुणाताई हांगे तसेच हांगे परिवारासमोर कु.दिपालीच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला.हांगे परिवारानेही विवाहाला सर्वानुमते होकार दिला.ना हुंडा ना वरदक्षीणा -समाजामध्ये हुंडा पद्धती अथवा वरदक्षीणेच्या नावाखाली वधु पक्षाकडुन काहीना काहीतरी घेण्याची प्रथा समाजात आहे.परंतु मुंडे परिवार हा बहुजन समाजातील असुन पुरोगामी विचारावर वाटचाल कराणारा असल्यामुळे विवाहाचा संपुर्ण खर्च स्वतः करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.श्रीमंताच्या ऐश्वर्यालाही लाजवेल असा विवाह सोहळा संपन्न होत असताना अबालवृद्धापासुन ते वधुवरापर्यंत सर्वत्र उत्साह शिगेला पोंहचला होता.समयसुचकतेचे आदर्श उदाहरण – विवाहाची वेळ ठरलेली असली तरी लग्न लावण्यासाठी नातेवाईक व निमंञीतांना तीनचार तास वाट पहावी लागते.वरपक्षाकडुन नाचण्याचा अट्टाहास वाढत राहुन विवाहाला आलेल्या मंडळीला नाहक ञास सहन करावा लागतो .परंतु मुंडे परीवाराच्या विवाहाची वेळ १-१५ वाजता असताना सुद्धा पंधरा मिनीटे अगोदरच वधुवर बहुल्यावर हजर राहुन अनेकांना आश्चयाचा धक्का दिला.मुंडे परीवाराने कमावलेली संपत्ती म्हणजे सामान्यातील सामान्य व्यक्ती पासुन ते प्रतिष्ठित व्यक्ती पर्यत जपलेली नाती याची पावती या विवाह सोहळ्यामध्ये पहावयास मिळाली सर्वसामान्य व्यक्ती पासुन ते राजकीय,सामाजिक , शैक्षणिक,सांस्कृतिक तसेच न्याय क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थीती हा चर्चेचा विषय ठरला.विठाई मंगल कार्यालय हे केज शहरातील सर्वात मोठे मंगल कार्यालय असताना सुद्धा निमंञीताच्या उपस्थीतीने खचाखच भरुन अनेकांना उभे राहुन वधुवरांना शुभाशिर्वाद देण्याची वेळ आली.हीच मुंडे परिवारावर प्रेम करणाऱ्यांची पावती होती.मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत -या विवाह सोहळ्यासाठी केजच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदकिशोर मुंदडा,माजी आमदार भाई जनार्धन तुपे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.विक्रमबप्पा मुंडे,केज पंचायत समितीचे माजी सभापती श्री.माधवराव मोराळे,प्रा.सौ.सुशीलाताई मोराळे,भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री.संतोष दादा हांगे,श्री.रमाकांत बापु मुंडे, जिल्हा परिषद सदस्य श्री.विजयकांत मुंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री.भगवान केदार,जनविकास परीवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई ईनामदार,केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,शिवसेनेच्या सौ.रत्नमालाताई मुंडे,संपादक श्री. शिवदास मुंडे,स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डाॕ.श्री.राकेश जाधव,मा.आयुक्त श्री.अच्युत हांगे,धारुर नगर पालीकेचे मा.नगराध्यक्ष श्री.आवेजभाई, सामाजिक कार्यकर्ते श्री.रणजीतसिंह(बहाद्दुर)पाटील,डाॕ.संभाजी वायबसे,शेकापचे भाई मोहन गुंड तसेच अन्य शेकापचे कार्यकर्ते तसेच मुंडे परिवाराचा मिञ परिवार, आप्तस्वकीय,व नातेवाईक मोठ्या संख्येने विवाह सोहळ्यासाठी उपस्थीत होते.मुंडे परिवाराने सर्व उपस्थीत मान्यवरांचे हार्दिक स्वागत करुन हा अनोखा विवाह सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
मुंडे-हांगे परिवाराचा अनोखा विवाह सोहळा ठरला अनेकांचे आकर्षण..!!
RELATED ARTICLES