HomeUncategorized'इन्फंट' च्या संकल्पनेतून आ.क्षीरसागरांचा अनोखा उपक्रम

‘इन्फंट’ च्या संकल्पनेतून आ.क्षीरसागरांचा अनोखा उपक्रम

बीड : आ.संदीप क्षीरसागर यांच्या मातोश्री रेखाताई क्षीरसागर यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते.त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधीनंतर आज शुक्रवार (दि.२२) रोजी राख सावरण्याचा कार्यक्रम होता.यावेळी इन्फंट इंडिया सामाजिक संस्थेचे दत्ता बारगजे यांच्या संकल्पनेतून आ.संदीप क्षीरसागर यांनी आईंची अस्थी व सावरण्याची राख टाकून वटवृक्षरोपण करत अत्यंत आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम राबविला.         

बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखाताई क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले होते.त्यांच्या पार्थिवावर गुरुवार (दि.२१) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.यानंतर आज राख सावरण्याचा कार्यक्रम होता.यावेळी,आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, सुख आणि दुःख प्रत्येकाच्या कुटुंबात आलेच.त्यामुळे सुखात आणि दुःखात जसे समाजऋण तसे सृष्टीचे ऋण फेडलेच पाहिजे.आज वाढते तापमान, प्रदुषण व पर्यावरणाचा असमतोल याच्या मुळाशी जाऊन आपण वृक्ष लागवड व जपवणूक केली पाहिजे या भावनेतून रेखाताई यांच्या दुखद निधनानंतर, इन्फंट इंडिया सामाजिक संस्थेचे दत्ता बारगजे यांच्या संकल्पनेतून आ.संदीप क्षीरसागर यांनी आज त्यांच्या शेतात एक मोठे वडाचे झाड लावून व त्याच्या  मुळाशी अस्थी व राख टाकून आईच्या स्मृती जतन केल्या.या आगळ्यावेगळ्या आणि स्तुत्य उपक्रमामुळे वेगळाच पायंडा पाडला आहे.याबद्दल आ.संदीप क्षीरसागर व दत्ता बारगजे यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments