Homeबीड ग्रामीणसत्ता परिवर्तनासाठी शिवसंग्रामचे "संकल्प शिबीर" - अनिल घुमरे

सत्ता परिवर्तनासाठी शिवसंग्रामचे “संकल्प शिबीर” – अनिल घुमरे

बीड : जिल्हा शिवसंग्रामच्या वतीने सत्ता परिवर्तनासाठी संकल्प शिबीराचे आयोजन शुक्रवार, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता बेलेश्वर देवस्थान मंदिर, बेलगांव ता. जि.बीड येथे करण्यात आले आहे. बीड जिल्हयातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ता यांचे हे प्रशिक्षण शिबीर होणार असून अगामी काळामध्ये होणाऱ्या बीड जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका ताकदीने लढवण्यासाठी आणि शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहे.अशी माहिती जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसे की जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा स्थानिक नगरपालिका निवडणूक यामधील सत्ता वर्षानुवर्षे ठराविक लोकांच्या ताब्यात राहिलेली आहे.त्यामुळे तेथील स्थानिक विकास खुंटला आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही,खऱ्या अर्थाने परिवर्तन करायचे असेल तर सर्वसामान्य तरुण वर्गाला संधी मिळणे अपेक्षित आहे.जेा की तळागाळातील लोकांना मदत करणारा असावा,सुसंस्कृत असावा,कायद्याची बूज राखणारा असावा,सर्वसामान्यांची दुःख जाणणारा, तळागाळातील लोकांना मदत करणारा असावा. असा तरुण वर्ग पुढे येणे अपेक्षित आहे.त्याकरिता संपूर्ण बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन आणि नियोजन करण्यात आलेले आहे. शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद बीड जिल्हा आयोजित जिल्हा प्रशिक्षण शिबिरानंतर चांगल्या पद्धतीचे सर्वसामान्यांना हक्काचे वाटणाऱ्या नेतृत्वास हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचाा आशावाद जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी व्यक्त केला. सदरील संकल्प शिबिर हे बीड जिल्ह्यातील सत्ता परिवर्तनासाठी आयोजित केलेले संकल्प शिबिर आहे.वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे मान्यवर वक्ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.या संकल्प शिबिराचे उद्घाटन शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. विनायकराव मेटे यांच्या शुभहस्ते होणार असूनप्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.राजनजी घाग, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री चिंतन अभिनंदन थोरात,चिंतन ग्रुप, पुणे, श्री रवी आंबेकर, श्री दिलीप सपाटे, श्री नितीन श्रावण सोनवणे, श्री अभिषेक नागपल्लीवार, श्री योगेश पवार, श्री संजय वरकड, श्री संतोषजी मानूरकर,आदी मान्यवर वक्ते यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे .हे शिबिर फक्त निमंत्रक कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी यांच्यासाठी असून शिबिराचे उद्घाटन सकाळी 9.30 वा. संपन्न होणार आहे.अशी माहिती जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments