बीड : राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरणे मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हा रुग्णालय बीड येथे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी बालकांना डोस पाजण्यात आले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. बाबासाहेब ढाकणे हे उपस्थित होते.माजलगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती कल्याण आबुज, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुभाष बडे, तालुका आरोग्य अधिकारी मधूकर घुबडे, जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. संतोष गुंजकर हे उपस्थित होते.अंबोजोगाई तालुक्यात बसस्टॅड येथे आमदार नमिता मुंदडा, रोटरी क्लब अंबाजोगाई व आरेाग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे हे उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र भावठाणा येथिल मोरेवाडी शाळेत आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन झाले. योवळी अशा वर्कर, आंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे आमदार संजयभाऊ दौड यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरअध्यक्ष पापा मोदी, माजी आमदार पुथ्वीराज साठे नगरसेवक बबनराव लोमटे यांची उपसस्थिती होती. आष्टी तालुक्यात ग्रामीण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश अण्णा धस यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 26 लाख 84 हजार 889 असून 2 लाख 8 हजार 824 बालकांना पोलिओची लस देण्यात आली आहे तर उर्वरित वंचित बालकांना मंगळवार दि. 2 मार्च 2022 पासून गृह भेटी देऊन लस दिली जाणार आहे तर शहरात 5 दिवस आणि ग्रामीण भागात 3 दिवस ही मोहिम सुरु राहणार असून पालकांनी आपल्या पाल्यांना न चुकता पोलिओ लस द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्तेराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन
RELATED ARTICLES