पात्रुड : शासनाने शेतकऱ्यांना गावातच तलाठ्याकडून शेतीचे कागदपत्र मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून तलाठी भवन बांधण्यात आले मात्र माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे उद्घाटन अभावी तलाठीभवनाला शौचालयाचे स्वरूप आले आहे. तलाठी भवन बंद असल्याकारणाने रोज सकाळी या ठिकाणी गावातील नागरिक मोठ्या हौसेने शौचे साठी या तलाठी भवनात जातात. विशेष म्हणजे याकडे येथील लोकप्रतिनिधी तहसीलदार तलाठी यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असताना विशेष म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न आणि शेती विषय लागणारी माहिती आणि सातबारा, आठ अ चा उतारा यासह शेतीविषयक लागणारे कागदपत्रे शेतकऱ्यांना तालुका तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नये यासाठी गावपातळीवर सरकारने चांगला निर्णय घेऊन तलाठी भवनाची निर्मिती केली. तसेच शासन नियमाप्रमाणे तलाठ्यास सज्जाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना देखील येथील तलाठी तालुक्यातून कारभार हाकत असल्याचे दिसून येत आहेत तसेच ते सज्जाच्या ठिकाणी कधीही हजर नसतात. यांच्यावरती तहसीलदार साहेबांचा अंकुश राहिलेला नसल्यामुळे ते मनमानी पणे कारभार करत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. लाखो रुपये खर्च करून माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे तलाठी भवन बांधण्यात आले. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या तलाठी भावनाचा वापर शौच करण्यासाठी मोठ्या हौसेने होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे येथील तलाठी भावनाचे शौचालय झालेले यांना काहीही वाटत नाही. विशेष म्हणजे माजलगाव मतदार संघात तलाठी भवन निर्माण करण्यासाठी तत्कालीन महसूल राज्यमंत्री मा. प्रकाश दादा सोळंके यांनी यासाठी भरपूर प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश सुद्धा आले मात्र केवळ उद्घाटन अभावी या सुंदर वास्तूचे शौचालय मध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे या शासकीय इमारतीचे मा. विभागीय आयुक्त साहेबांनी व जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ दखल घेऊन पात्रुड येथील तलाठी कार्यालयाला भेट देऊन हे तलाठी कार्यालय चालू करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात याव्यात व येथील तलाठी यांना सज्जा वरती राहण्यास बंधनकारक करावे जेणेकरून शेतकऱ्यांच्या समस्या पात्रुड सज्जा मध्ये सुटतील अशी मागणी पात्रुड येथील शेतकरी वर्गातून होत आहे.
लोकप्रतिनिधीसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाखोच्या इमारतीकडे केले दुर्लक्ष
RELATED ARTICLES