आष्टी / पठाण शाहनवाज :- आष्टी तालुक्यातील तागड़खेल येथील रहिवाशी असलेले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हा सरचिटणीस म्हणून उल्लेखनीय कार्य करून सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करणारे युवा कार्यकर्ते शौकत पठाण यांना सावरगाव गणातुन राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी देण्याची मागणी गणातील युवकांमधुन होत आहे.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दौलावडगांव गटातील सावरगाव गणामधुन राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेले शौकत पठाण हे सामाजिक धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.तसेच गोर गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी हजर असणारे शौकत पठाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय द्यावा,अशी मागणी हौसराव शिरसाठ सागर गायकवाड मुन्ना शेख निलेश चव्हाण पांडुरंग शिरसाठ संदीप शिंदे नवनाथ राठोड किरण गव्हाने अय्युब शेख गणेश गव्हाने किशोर गव्हाने नागेश गव्हाने अविनाश गव्हाने सुनील शिंदे इत्यादींनी केली आहे.
सावरगाव गणातुन शौकत पठाण यांना उमेदवारी देण्याची मागणी
RELATED ARTICLES