पात्रुड नईम आतार : माजलगाव तालुक्यातील अनेक गोरगरीब कुटुंबियांना शिधापत्रिका नसल्यामुळे राशन च्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. अनेक महिन्यापूर्वी शिधापत्रिकेच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून तहसील कार्यालया मध्ये ऑनलाइन करून सुद्धा गेल्या अनेक महिन्यापासून तहसील कार्यालयामध्ये शिधापत्रिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक गोरगरीब व गरजवंत तसेच लाभार्थ्यांना कार्यालयामार्फत शिधापत्रिका उपलब्ध नसल्यामुळे राशन धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.वेळोवेळी तहसील कार्यालयाच्या चकरा मारून देखील तेथील कर्मचाऱ्यांना राशन कार्ड बद्दल विचारणा केली असता. कर्मचारी राशन कार्ड शिधापत्रिका आणखी उपलब्ध नसल्याचे सांगतात तरी जिल्हा प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे गोरगरीब आणखी किती दिवस शिधापत्रिकेची (राशन कार्ड) ची वाट बघत बसावी लागेल. यामुळे अनेक गोरगरीब शिधापत्रिके विना उपाशी असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यावर येथील तहसील प्रशासन काही उपाययोजना करेल का ? असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.तरी गोरगरीब जनतेच्या शिधापत्रिका (राशन कार्ड)मिळण्यासाठी मा. विभागीयआयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब यांनी या प्रश्नावरलक्ष घालण्याची गरज आहे. गोरगरीब जनतेला नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्यास गोरगरीब जनतेच्या हक्काचे राशन, स्वस्त धान्य उपलब्ध होईल व गोरगरीब जनता त्यांच्या मिळणाऱ्या हक्काचा राशन स्वस्त, धान्यापासून वंचित राहणार नाही. तरी नवीन राशन कार्ड शिधापत्रिका लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रशासन सुन्न कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होणार असा सवाल जनतेतून बोलला जात आहे.
शिधापत्रिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक गोरगरीब हक्काच्या राशन पासून वंचित
RELATED ARTICLES