बीड : एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यालयात नवीन एकवीस पदाधिकाऱ्यांना निवडीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच चार जणांनी पक्षात प्रवेश केला. नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्ती मध्ये समतोल साधला गेल्याने नवीन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. बशीर गंज येथील मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष शफिक भाऊंच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नेते अब्दुस सलाम सेठ, जिल्हा सचिव हाजी अय्युब खान पठाण, तालुकाध्यक्ष शेख एजाज (खन्ना भैया)हाफिज अशपाक, मोमीन अजहर, सय्यद इलयास आदींच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते साजन चौधरी यांना बीड तालुका उपाध्यक्ष हे पद देण्यात आले आहे. साजन चौधरी हे एआय एम आय एम पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सर्वत्र परिचित आहेत पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी पार पाडले आहे संघटन कौशल्य हा गून लाभलेल्या चौधरी यांच्या रूपाने पक्ष मजबूत होण्यास मदत होईल. चौधरी यांच्या निवडीमुळे बीड तालुक्यात पक्षसंघटना मजबूत होईल असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे. चौधरी यांच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
साजन चौधरी यांची एआय एमआय एम च्या बीड तालुका उपाध्यक्ष पदी निवड..!!
RELATED ARTICLES