संग्रामपुर : तालुक्यातील पातुर्डा येथील राज्य पुरस्कार प्राप्त प्ररख्यात अ वर्गाचे तालुका सरस्वती वाचनालयाला राज्य ग्रथांलय संघाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार वर्धा यांनी सदिच्छ भेट देऊन सरस्वती वाचनालयातील विविध ग्रंथ पुस्तक संग्रालयाची पाहनी केली सर्व प्रथम सरस्वती वाचनालय सभागृहात गान संम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना राज्य ग्रंथालय संघ व सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्माने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी राज्य ग्रंथाल संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, ग्रंथालय संघाचे नेमिनाथ सातपुते , संजय भोयर यांचा सरस्वती वाचनालय अध्यक्ष उत्तमराव तायडे , सचिव हिंम्मतराव देशमुख , सहसचिव विनायक चोपडे , संचालक प्रकाश दवे ,संचालक तथा ग्रंथाल संघाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार चांडक, व कर्मचारी वृंद यांनी वाचनालयाच्या वतीने उपरोक्त मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तदनंतर सरस्वती वाचनालय संचालक मंडळाची बैठक घेऊन समस्या जानुन घेऊन ग्रंथपाल अनंत सातव यांच्या उत्कृत कार्याचे कौतुक करित डॉ कोटेवार यांनी ग्रंथपाल सातव यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच मार्गदर्शन करतांना समस्या सोडवुन न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले तद्नंतर सरस्वती वाचनालयाला स्थापनेला ७२ वर्ष झाल्याने प्रास्ततिकतेतुन ग्रंथालय संघाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार चांडक यांनी झालेल्या सरस्वती अध्यक्ष वाचनालयाच सत्काराला उत्तर देतांना लहान रोपट्याचे वटवृक्ष कसे झाले व यात तन मन धनाने सहकार्य करणारे स्वर्गीय भिकमचंद उपाख्य लाला सेठ चांडक, सुर्यकांत बाहेकर , ग्रंथपाल कचरुमल राठी यांचे योगदान सिहांचा वाटा या बद्दल विस्तृत माहिती विषद केली या प्रसंगी नेमिनाथ सातपुते यांनी स्व . सुर्यकांत उर्फ दादासाहेब बाहेकर , स्व . भिकमचंदजी उपाख्य लालासेठ चांडक , स्व . कचरुमल राठी यांच्या स्मृतींना उजाळा दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरस्वती वाचनालयाचे सहायक ग्रंथपाल शाम इंगळे , गजानन राजनकार , निखिल देशमुख यांनी प्रयत्न केले
राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष डॉ कोटेवार यांची पातुर्डा सरस्वती वाचनालयास सदिच्छ भेट..!!
RELATED ARTICLES